आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

तयारी:भारतीय नौदलाची मिग-29 विमाने चीनलगत सीमेवर तैनात करणार

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पी-8 आय विमानांची पूर्व लडाख भागात गस्त, स्वदेशी ड्रोनचीही नजर

चीन सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर हवाई दलाची “पी- ८ आय’ विमाने पूर्व लडाख भागात सतत गस्त घालत आहेत. दरम्यान, चीनच्या काेणत्याही कारवाईला चाेख प्रत्युत्तर देण्याच्या दृष्टीने हवाई दलाची लढाऊ जेट “मिग- २९ के’ उत्तर सीमेवर तैनात केली जातील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीन सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर तिन्ही सेनादलातील समन्वय वाढवण्याचे निर्देश दिले होते. शिवाय चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल बिपिन रावत यांनी उत्तर किंवा पश्चिम सीमेवर हवाई दलासह सागरी युद्धक्षेत्रात लढण्याची क्षमता असलेली विमाने तैनात करण्याचे संकेत दिले होते. त्यानुसार, हा निर्णय झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

हवाई दलाच्या उत्तरेतील तळावर मिग तैनात करण्याची योजना आहे. त्यांचा वापर प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएसी) पूर्व लडाख भागात गस्त घालण्यासाठी केला जाऊ शकतो. देशात ४० पेक्षा जास्त मिग फायटर जेटचा ताफा आहे. तो सध्या विमानवाहू नौका आयएनएस विक्रमादित्यवर तैनात आहे.

सीमेवर लक्ष ठेवण्यासाठी स्वदेशी ड्रोन : 

चीनच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी भारतीय लष्कराला देशी बनावटीचा “भारत’ ड्रोन उपलब्ध झाला आहे. हा स्वदेशी ड्रोन डीआरडीओने तयार केला असून त्याद्वारे लष्कर पूर्व लडाखमध्ये उंच आणि पर्वतीय प्रदेशातील हालचालींवर लक्ष ठेवू शकेल.

स्वदेशी ड्रोनचीही नजर

> डीआरडीओतील सूत्रांनी सांगितले की, आकाराने लहान मात्र अत्यतं शक्तिशाली हा ड्रोन कोणत्याही भौगोलिक परिस्थितीत चोख काम करू शकताे. आधुनिक तंत्रज्ञानासोबत युनिबाॅडी बायोमिमेटिक रचनेनुसार खास देखरेखीसाठी तो तयार करण्यात आला आहे.

> ड्रोनमध्ये कृत्रिम गुप्तचर यंत्रणाही आहे. शत्रू व मित्राचा शोध घेऊन त्यानुसार हा ड्रोन कारवाई करण्यात सक्षम आहे. थंड प्रदेशांतही तो देखरेख करेल.