आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Indo China News Update; Negotiations Are Ongoing With India, But China Is Still Continuously Increasing Infrastructure And Troops In Eastern Ladakh.

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भारत-चीन वाद:गलवान घाटीतील परिस्थिती ‘जसै थे’; चीनी लष्कर अद्यापही घाटीतच तैनात

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • दोन दिवसांपूर्वी कमांडील लेव्हलवर झालेल्या बैठकीनंतर लष्कर मागे घेण्यावर सहमती झाली होती

गलवानमध्ये 15 जूनला झालेल्या हिंसक चकमकीनंतर भारत-चीनचे कमांडर लष्कर मागे घेण्यास तयार झाले आहेत. आज डिप्लोमॅटिक लेव्हलवर चर्चाही झाली, पण गलवानमधील तनाव अद्याप कमी झाला नाही. लष्कराच्या सूत्रांनी एएफपी या वृत्तसंस्थेला सांगितले की, घाटीमध्ये चीनी लष्कर अद्याप तैनात आहे. यादरम्यान, भारतीय वायुसेनेच्या फायटर जेट्सनेही परिसरातून उड्डाण घेतली आहे.

इन्फ्रास्ट्रक्चर वाढवत आहे चीन

न्यूज एजेंसी एएनआयने सांगितले की, पूर्व लद्दाखमध्ये चीन आपले इन्फ्रास्ट्रक्चर आणि जवान वाढवत आहे. चीनची पीपुल्स लिबरेशन आर्मी (पीएलए) पँगोंग तलाव, ज्याला फिंगर एरिया म्हटले जाते, तिथे निर्माणाचे कार्य सुरू असून, जवानही वाढवत आहे. या परिसरात चीनने 4 मे पासून ठिकाणं वाढवण्यास सुरुवात केली आणि आतापर्यंत जवळपास दहा हजार जवान तैनात करण्यात आले आहेत.

गलवान घाटीतही चीनने इन्फ्रास्ट्रक्चर वाढवले

सूत्रांनुसार, भारतीय लष्कर पूर्व लद्दाखमध्ये फिंगर-8 पर्यंतच्या जागेला आपली सीमा मानते, आता झालेला वाद यावरुनच झाला. कारण, चीनच्या जवानांनी या जागेवरुन भारतीय जवानांना पुढे जाऊ दिले नाही. या परिसरात चीन आपला ताबा वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. गलवान घाटीत जिथे चीनसोबत झालेल्या हिंसक चकमकीत भारताचे 20 जवान शहीद झाले होते, तिथेही चीनने नवीन ठिकाणं बनवली आहेत. भारतीय सीमेतील  पेट्रोलिंग पॉइंट पीपी-15, पीपी-17 आणि पीपी-17ए जवळ चीनने जी ठिकाणं बनवली आहेत, ती अजूनही तशीच आहेत. चीन येथील रस्त्यांचा उपयोग करतो आणि गरज पडल्यास या मार्गाने चीन आपले सैनिक आणि उपकरण भारतीय सीमेत पाठवू शकतो.

बातम्या आणखी आहेत...