आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Indo China Soldier Clashes Again : Chinese Army Tried To Infiltration Near Pangong Lake; The Indian Jawans Stopped Them News And Updates

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चीनच्या कुरापती सुरूच:चीनचे 500 सैनिक पँगाँगवर कब्जा करण्यास सरसावले होते, भारतीय जवानांनी पिटाळले; पूर्व लडाखमध्ये 75 दिवसांनंतर पुन्हा तणाव, शिखर ताब्यात घेण्याचा प्रयत्न

मुकेश कौशिक | न‌वी दिल्ली5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • चीनच्या हालचालींआधी मिळाली गुप्त माहिती, भारतीय सैनिक पाहून अवाक् झाले चिनी

चीनने ७५ दिवसांनंतर पुन्हा प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळील पूर्व लडाखमध्ये कुरापत काढली. २९-३० ऑगस्टच्या रात्री चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या (पीएलए) सुमारे ५०० सैनिकांनी शस्त्रास्त्रांसह पँगाँग सरोवराच्या दक्षिणेकडील एका डोंगरावर कब्जा करण्याचा प्रयत्न केला, तो भारतीय लष्कराने हाणून पाडला. सूत्रांनी सांगितले की, चीनने रात्री ११ वाजता ही कुरापत काढली. मात्र, त्याची गोपनीय माहिती त्याआधी तीन तास मिळाली होती. चीनमधील स्पांगुर भागातून या हालचालींचे संकेत मिळताच भारतीय लष्कराने किमान तीन शिखरांवर जवान तैनात केले. दोन्ही बाजूंच्या सैनिकांच्या जथ्थ्याच्या हालचाली रात्रभर सुरू होत्या. सकाळ होईपर्यंत भारतीय लष्कराने सर्व रणनीतिक पॉइंट्सवर तैनाती वाढवून आपला भाग अभेद्य बनवला आहे. लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितले की, ब्लॅक टॉप पहाडासमोरील भारतीय शिखरावर कब्जा करण्याचा पीएलएचा हेतू होता. अखेरचे वृत्त हाती आले तेव्हा चिनी सैनिकांचे पथक खालच्या भागात आहे. हा भाग तीन शिखरांवर बसलेल्या भारतीय सैनिकांच्या टप्प्यात आहे.

चीनची ३ भागांतून माघार नाहीच

१५ जूनला गलवानमध्ये चकमकीत भारताचे २० सैनिक हुतात्मा झाले होते. त्यानंतर वादग्रस्त भागातून सैनिक मागे घेण्यासाठी भारत-चीनच्या लष्करी अधिकाऱ्यांत दोन वेळा बैठक झाली. पण त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही. चीनने अजूनही लडाखच्या फिंगर एरिया, देप्सांग आणि गोगरा या भागांतून माघार घेतलेली नाही.

चोख प्रत्युत्तर कधी देणार?

घुसखोरी व कब्जा करण्याचा प्रयत्न लडाखपुरताच मर्यादित राहिलेला नाही. लिपुलेख भागात चिनी लष्कर तैनात आहे. चीनने डोकलाममध्ये क्षेपणास्त्रे तैनात केली आहेत. पंतप्रधान मोदी चीनला कठोर प्रत्युत्तर कधी देणार? - रणदीप सुरजेवाला, काँग्रेसचे प्रवक्ते

काँग्रेस अश्रू का ढाळतेय?

भारतीय लष्कराने शेजारी देशाचे इरादे हाणून पाडत सार्वभौमत्व कायम राखले असताना काँग्रेस अश्रू का ढाळत आहे? भारत व पंतप्रधान मोदींनी चीनला ‘लाल डोळे’ दाखवले आहेत, मग काँग्रेस का रडत आहे? - संबित पात्रा, भाजपचे प्रवक्ते

कैलास मानसरोवराजवळ चीनने तैनात केली क्षेपणास्त्रे

चिनी लष्कराने लडाखजवळील विमानतळावर जे-२० लढाऊ विमाने तैनात केली आहेत. ती २९-३० ऑगस्ट दरम्यान रात्री झालेल्या घटनेआधीच तैनात करण्यात आली. त्यांची उड्डाणे अजूनही सुरू आहेत. दरम्यान, कैलास मानसरोवराच्या किनाऱ्यावर चीन जमिनीवरून हवेत मारा करणारी डीएफ-२१ क्षेपणास्त्रे तैनात करत आहे. ती २२०० किमीपर्यंत मारा करू शकतात. यामुळे दोन्ही देशांतील वाद आणखी जटिल होऊ शकतो.

तज्ज्ञांची प्रतिक्रिया : चीनने उघडली चौथी आघाडी, भारतासोबतच्या राजनैतिक चर्चेत किंमत वसूल करण्याचा आहे डाव

लष्कराच्या उत्तर कमांडची जबाबदारी सांभाळलेले लेफ्टनंट जनरल विनोद भाटिया म्हणाले की, चिनी सैन्याचा हा प्रयत्न त्याच्या ‘क्रीपिंग पॉलिसी’चा एक भाग आहे, असे वाटते. या धोरणांतर्गत ते ३००-३०० फूट पुढे सरकतात. या भागात त्यांचा एक रस्ताही आहे. त्यावर नियंत्रण मिळ‌वण्याच्या उद्देशाने एखाद्या शिखरावर बसण्याचा त्यांचा हेतू होता. भारतीय लष्कराने ते हेरले. पूर्व लडाखच्या तीन भागांतील वादानंतर चौथ्या भागात ही नवी आघाडी उघडण्यात आली आहे. भारतासोबतच्या राजनैतिक चर्चेत किंमत वसूल करण्याचा चीनचा डाव असावा, असे वाटते.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser