आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
लडाखमध्ये २० जवानांच्या बलिदानाचा राग देशातील जनता चिनी मालावर काढत आहे. गुरुवारी दुसऱ्या दिवशीही जागोजाग चिनी मालाची होळी करण्यात आली. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनचे नाव न घेता स्वावलंबनाचा मंत्र देत आयात माल कमी करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, ‘व्यापाऱ्यांनी भक्कमपणे आत्मनिर्भर अभियान सुरू करावे. मी तुमच्यासोबत आहे.’ केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी अधिकाऱ्यांनाही चिनी माल खरेदी करू नका, असे निर्देश दिले. त्यांनी लोकांनाही चिनी मालावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले. दुसरीकडे, रेल्वेने चिनी कंपनीचे ४७० कोटी रुपयांचे एक कंत्राट रद्द केले. सोबत १ हजार कोटी रुपयांचे पार्ट्स खरेदी करारही संपवण्याची तयारी केली.
देशातील सुमारे ७ कोटी दुकानदारांची संघटना असलेल्या कॅटने भारतीय सामान-आमचे अभियान मोहीम सुरू केली. अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर यांसारख्यांनी चिनी मालाची जाहिरात करू नये, असे आवाहनही केले.
आता व्यवसायावर वार : चिनी कंपनीच्या कामात गती नव्हती म्हणून काढून घेतले
रेल्वेने एका चिनी कंपनीचे ४७१ कोटी रुपयांचे कंत्राट रद्द केले आहे. डेडिकेटेड फ्रेट कॉर्पोरेशन आॅफ इंडियाने (डीएफसीसीआयएल) काम संथ गतीने होत असल्याच्या आधारावर ही कारवाई केली. हे काम कानपूर-दीनदयाल उपाध्याय सेक्शनमध्ये सिग्नलिंग आणि दूरसंचाराशी संबंधित होते. त्या आधी, सरकारने बीएसएनएलच्या ४जी अपग्रेडेशनमध्येही चिनी उपकरणांचा वापर न करण्याचा निर्णय घेतला.
चिनी सरकारी वृत्तपत्र म्हणाले बहिष्काराचा आवाज दाबावा
चिनी उत्पादनांवर बहिष्काराच्या मागणीवर चीन बिथरला आहे. चीनचे सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सने भारत सरकारने अशा मोहिमा थोपवाव्यात अशी मागणी केली आहे. सीमावाद व्यापाराशी जोडणे योग्य नाही. दंगल, सिक्रेट सुपरस्टार व हिंदी मीडियमसारख्या चित्रपटात भारतीयांना प्रामाणिक, मैत्रीपूर्ण आणि विनम्र दाखवण्यात आले आहे. चिनी नागरिकांनी त्याचे कौतुकच केले आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.