आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • INDO CHINA WAR ;To Beat China, India Has Made A Quad With America, Japan And Australia, If The Circumstances Of War Arise, All Four Countries Can Come Together

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भारताची स्ट्रॅट‌जी:चीनला मात देण्यासाठी भारताने अमेरिका, जापान आणि ऑस्ट्रेलियासोबत बनवला आहे क्वॉड, युद्ध झाल्यास हे देश भारताच्या बाजुने

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • क्वॉडला 'द क्वॉड्रिलैटरल सिक्योरिटी डायलॉग'देखील म्हटले जाते, या ग्रुपची स्थापना 2007 मध्ये झाली होती
  • मार्चमध्ये कोरोनावर क्वॉडची मीटिंग झाली होती, पहिल्यांदाच न्यूजीलँड, द. कोरिया आणि वियतनाम सामील झाले

भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये 45 वर्षात पहिल्यांदा हिंसक मारामारी झाली, यानंतर सीमेवर तैणाव वाढला आहे. यामुळे 58 वर्षानंतर परत एकदा भारत-चीनमध्ये युद्धाची परिस्थिती बनली आहे. पण, जर युद्ध झालेच, तर कोणते देश भारताच्या बाजुने असतील, आणि कोणते चीनच्या ? याबाबत जगभरातील स्ट्रॅटजिक एक्सपर्ट्स भारताची बाजु मजबूत सांगत आहेत.

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पॉम्पियो यांनी ट्वीट करुन भारतीय शहीदांबाबत दुःख व्यक्त केले आहे. भारतातील ऑस्ट्रेलियाचे राजदूत बॅरी ओ फ्रेल यांनीदेखील भारताच्या धैर्याचे कौतुक केले आहे. अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया, दोन्ही देश क्वॉड ग्रुपचा भाग आहेत. यासोबतच भारत आणि जापानदेखील ग्रुपमध्ये आहेत. जगभरातील संरक्षण जानकारांचे म्हणने आहे की, युद्ध झाल्यास अनेक क्वॉड देश भारताच्या बाजुने येऊ येतील.

काय क्वॉड ग्रुप?

2007 मध्ये जापानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी हा ग्रुप बनवण्यासाठी प्रस्ताव मांडला होता. याला भारत, अमेरिका आणि ऑस्ट्रेलियाने समर्थन दिले होते. परंतू, 10 वर्षापर्यंत हा निष्क्रिय होता. पण, 2017 नंतर चारही देशांच्या बैठका होत आहेत. क्वॉड ग्रुपमध्ये सामील चारही देशांची एकच चिंता आहे, ती म्हणजे चीनचा वाढता दबदबा. विशेषतः त्याचे विस्तारवादी धोरण. याठिकाणी हेदेखील लक्षात ठेवावे लागेल की, क्वॉड मिल्ट्री अलायंस नाहीये. तरीदेखील चीनने कोणाला नुकसान पोहचवण्याचे ठरवल्यास, सर्व देश सोबत येऊ शकतात. 2017 ते 2019 दरम्यान क्वॉड ग्रुपमध्ये पार बैठका झाल्या. यावर्षीय कोरोना व्हायरसबाबात क्वॉड ग्रुपची बैठक झाली होती. या बैठकीत पहिल्यांदा न्यूजीलँड, दक्षिण कोरिया आणि वियतनामला सामील केले होते.

क्वॉड ग्रुपच्या देशांसोबत भारताची भागेदारी-

1. अमेरिका : चीनला काउंटर करण्यासाठी डिफेंस पार्टनरचा दर्जा दिला

भारत-अमेरिकेदरम्यान 2002 मध्ये जनरल सिक्योरिटी ऑफ मिल्ट्री इन्फोर्मेशन अॅग्रीमेंट झाला होता. यात ठरवले होते की, गरज पडल्यास दोन्ही देशांच्या मिल्ट्री इंटेलिजेंस एकत्र येतील. मागील 12 वर्षात भारताने अमेरिकेसोबत 18 अब्ज डॉलर (1.36 लाख कोटी रुपये) शस्त्र खरेदी केले आहेत.

फेब्रुवारीमध्ये अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दैऱ्यापूर्वीच भारताने 2.6 अब्ज डॉलर (19 हजार 760 कोटी रुपये) मध्ये 24 एमएच 60 आर मल्टीरोल हेलीकॉप्टर खरेदीला मंजूरी दिली आहे. इतकेच नाही, तर चीनला काउंटर करण्यासाठी ट्रम्प यांनी 2016 मध्ये भारतला 'डिफेंस पार्टनर'चा दर्जा दिला होता.

2. ऑस्ट्रेलिया : 1962 च्या युद्धात मदत केली होती

भारत-ऑस्ट्रेलियामधील डिफेंस रिलेशन अनेक वर्षे जुने आहेत. स्वातंत्र्यापूर्वी महायुद्धादरम्यान भारतीय आणि ऑस्ट्रेलियन सैनिक सोबत लढले होते. स्वातंत्र्यानंतर 1962 मध्ये भारत-चीन युद्धात ऑस्ट्रेलियाने भारताला सैन्य पुरवले होते. इतकेच नाही, तर दोन्ही देशांच्या नौसेना हिंद महासागरात एक्सरसाइज करतात, ज्याला ऑसइंडेक्स (AUSINDEX)म्हटले जाते. 

3. जापान : दोन्ही देशांमध्ये 2008 मध्ये संरक्षण करार झाला

भारत आणि जापानमध्ये खुप जवळचे डिफेंस रिलेशन आहेत. दोन्ही देशांमध्ये ऑक्टोबर 2008 मध्ये एक संरक्षण करारदेखील झाला होता. या करारा अंतर्गत, दोन्ही देश आशिया-प्रशांत क्षेत्रात समुद्री चोरीसारख्या घटनांविरोधात सोबत काम करत आहेत. भारत-जापानमध्ये इतके चांगले संबंध आहेत की, जापानी पंतप्रधान शिंजो आबे यांना 'इंडोफाइल'देखील म्हटले जाते. म्हणजे, असा व्यक्ती, जो नेहमी भारताच्या बाजुने आहे. 

हे दोन देशही भारतासोबत येऊ शकतात

इस्राइल : 1971 ची लढाई आणि कारगिल युद्धात भारताला मदत केली

सप्टेंबर 1968 मध्ये जेव्हा भारतात रिसर्च अँड अॅनालिसिस विंग म्हणजेच रॉ ची स्थापना झाली होती, तेव्हा इस्राइलची गुप्त संघटना मोसादने भारताची खुप मदत केली होती. यानंतर 1971 मध्ये पाकिस्तानसोबत झालेल्या युद्धात आणि 1999 मध्ये कारगिल युद्धात इस्राइलने भारताला आधुनिक शस्त्र दिले होते. मागच्या वर्षी पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय वायुसेनेने ज्या स्पाइस-2000 बॉम्बने मुजफ्फराबाद, चकोटी आणि बालाकोटमध्ये एअर स्ट्राइक केली होती, तो स्पाइस-2000 बॉम्ब इस्राइनले दिला होता.

फ्रांस : 1998 मध्ये न्यूक्लियर टेस्टला फ्रांसने पाठिंबा दिला होता

1998 मध्ये भारताने पोखरणमध्ये जेव्हा न्यूक्लियर टेस्ट केली होती, तेव्हा अनेक देशांनी याची निंदा केली होती. पण फ्रांसने याला भारताच्या सुरक्षेसाठा महत्वाचे म्हटले होते. त्यानं 1998 पासून दोन्ही देशांमध्ये न्यूक्लियर, स्पेस, काउंटर-टेररिज्म, सायबर सिक्योरिटीसारख्या मुद्द्यांवर बातचीच होत राहिली. 2001 पासून दोन्ही देशांच्या नौसेना, 2004 पासून वायुसेना आणि 2011 पासून थलसेना सोबत एक्सरसाइज करत आहेत. 2016 मध्ये भारताने फ्रांस सरकार आणि डसॉल्ट एविएशनसोबत 6 खर्व रुपयांची 36 राफेल विमानाची डील केली होती. लवकरच भारतात राफेल विमान येणार आहेत.

चीनच्या बाजुने कोणते देश येऊ शकतात 

1. पाकिस्तान : 2008 ते 2017 दरम्यान चीनसोबत 6 अब्ज डॉलरचे शस्त्र विकत घेतले.

भारताविरोधातीललढाईसाठी पाकिस्तान, चीनसोबत असेल. याबाबत चीननेही सांगितले आहे. चीनचे सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सने लिहीले की, जर एलएसीवर तणव वाढला, तर भारताला चीनसोबतच पाकिस्तानी आणि नेपाळच्या सेनांचा सामना करावा लागेल. पाकिस्तान पूर्णपणे चीनवर अवलंबुन असल्यामुळे, ते चीनची साथ देतील.

2. उत्तर कोरिया : दोन्ही देशात करार, हल्ला झाल्यास एकत्र येणार.

चीन आणि उत्तर कोरियामध्ये 1961 मध्ये एक करार झाला होता. यानुसार दोन्हीपैकी कोणत्याही देशावर हल्ला झाल्यास, दुसरा देश साथ देईल. याशिवाय 1950 मध्ये कोरियन वॉरमध्ये चीनने उत्तर कोरियाला साथ दिली होती. 

बातम्या आणखी आहेत...