आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Indo Chinese Troops Face Each Other On The Line Of Actual Control, China's Largest Military Gathering In The Spangur Gap In Ladakh

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सीमेवर तणाव कायम:भारत-चीनचे जवान प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर काही पावलांवर आमनेसामने! लडाखच्या स्पांगुर गॅपमध्ये चीनची मोठी लष्करी जमवाजमव

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • उभय देशांतील कमांडर पातळीवरील चर्चा पुन्हा अनिर्णीतावस्थेत संपली
  • पँगाँग त्सोमध्ये भारतीय लष्कराचीही चीनला तोडीस तोड तैनाती

परराष्ट्रमंत्र्यांत पाच मुद्द्यांवर एकमत होऊनही लडाखमध्ये चीनच्या कुरापती सुरूच असल्याने तणाव कमी होण्याची चिन्हे नाहीत. तणाव वाढू नये म्हणून भारत आणि चीनच्या ब्रिगेड कमांडर्सनी शनिवारी चुशुलमध्ये चर्चा केली. सुमारे ४ तास चाललेली ही बैठकही अनिर्णीत ठरली.

दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चीनने पूर्व लडाखच्या पँगाँगमधील दक्षिण भागात स्पांगुर गॅपमध्ये हजारो जवान, रणगाडे आणि हॉवित्झर तोफांची जमवाजमव केली आहे. हे चिनी सैनिक भारतीय जवानांच्या रायफल रेंजच्या आत म्हणजे काही पावलांवरच आहेत. सूत्रांनुसार, या तैनातीनंतर भारतीय जवानही हाय अलर्टवर आहेत. भारताने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएसी) पँगाँग त्सोच्या दक्षिण किनाऱ्यानजीक सामरिक दृष्टीने महत्त्वाच्या दऱ्याखोऱ्यांत आपले जवान तैनात केले आहेत.

पँगाँग त्सोमध्ये भारतीय लष्कराचीही चीनला तोडीस तोड तैनाती

एका सरकारी अधिकाऱ्याने सांगितले की, ‘चीनच्या लष्करी तुकड्या, शस्त्रास्त्रांच्या तैनातीकडे पाहता भारतीय लष्करानेही स्पांगुर गॅप भागात तोडीस तोड जवान तैनात केले आहेत. सूत्रांनी सांगितले की, चीनने तिबेट भागाला स्थिर करण्यासाठी आपले मिलिशिया दस्ते तैनात केले आहेत. त्यांना सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या शिखरांवरून भारतीय जवानांना मागे हटवण्याचे काम दिले आहे.

सीमेवर अतिरिक्त जवानांसाठीही पुरेसा अन्नसाठा : सीडीएस बिपिन रावत

सीमेवर तैनात असलेल्या जवानांसाठी पुरेसा अन्नसाठा असल्याचा विश्वास सीडीएस जनरल बिपिन रावत यांनी संरक्षणात्मक बाबींसंबंधी संसदेच्या स्थायी समितीकडे व्यक्त केला आहे. सूत्रांनुसार, शुक्रवारी संरक्षण समितीच्या बैठकीदरम्यान रावत यांनी सीमेवर सैन्यासाठी पुरेसा अन्नसाठा असल्याचे सांगितले. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सीमेवरील जवानांच्या आहारात भेदभाव होऊ नये असे म्हटले होते. यावर रावत बोलत होते.

अमेरिकी खासदारांकडून चीनला तंबी; शेजाऱ्यांसोबतचा वाद शांततेत सोडवा

अमेरिकेतील संसदेच्या खासदारांनी भारत आणि चीनमध्ये सुरू असलेल्या तणावावर चिंता व्यक्त केली आहे. भारतवंशीय अमेरिकी खासदार अॅमी बेरा म्हणाले, दोन्ही देशांनी चर्चेद्वारे वादग्रस्त क्षेत्रांमधून सैन्य माघार घ्यायला हवी. चीनने आपल्या शेजारी राष्ट्रांसोबतचा वाद शांततेच्या मार्गाने सोडवायला हवा.