आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Indore Building Fire Incident Photos And Video Updates । Short Circuit Fire In The Building, Took A Terrible Form In A Few Seconds

इंदूरमध्ये 7 जण जिवंत जळाले:8 मजली इमारतीला आग, काही मिनिटांतच जळाले लोक; गुदमरून झाले मृत्यू

इंदूर12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंदूरच्या विजय नगरमधील एका 8 मजली इमारतीला शुक्रवारी रात्री उशिरा भीषण आग लागली. पोलिस आयुक्त हरिनारायणाचारी मिश्रा यांनी सांगितले की, आगीमुळे 7 जण जिवंत जळाले आहेत. मृतांमध्ये 6 पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. सर्वजण झोपेत असताना ही दुर्घटना घडली. आगीने लगेचच भीषण रूप धारण केले. काही समजण्याआधीच काही जण जळाले, तर काही जण गुदमरले.

माहिती मिळताच वरिष्ठ अधिकारी आणि अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले. अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात आली. पोलिसांनी मृतांचे मृतदेह एमवाय हॉस्पिटलमध्ये पाठवले आहेत. आगीचे कारण शॉर्टसर्किट असल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांचा तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, खजराना रिंग रोडवरील स्वर्ण कॉलनीतील आठ मजली इमारतीला आग लागली. येथे 13 दुचाकी व एक चारचाकी वाहन जळाले आहे. इमारत इन्साद पटेल यांची आहे. येथे 10 फ्लॅट होते. मिळालेल्या माहितीनुसार, रात्रीतून 9 जणांची सुटका करून त्यांना बाहेर काढण्यात आले आहे. आगीत भाजून ज्यांचा मृत्यू झाला ते या इमारतीत भाड्याने राहत होते. यातील काही लोक शिक्षणासाठी आले होते. तर काही जण जॉब करत होते.

आगीत होरपळून मृत्युमुखी पडलेले 7 जण या इमारतीत भाड्याने राहत होते. यातील काही लोक शिक्षणासाठी आले होते. तर जण नोकरी करत होते.
आगीत होरपळून मृत्युमुखी पडलेले 7 जण या इमारतीत भाड्याने राहत होते. यातील काही लोक शिक्षणासाठी आले होते. तर जण नोकरी करत होते.

झोपेतून उठताच काळाने गाठले

आगीने एवढं भीषण रूप धारण केलं की कोणालाही सावरण्याची संधी मिळाली नाही. झोपेतून जागे झालेल्या लोकांना काही समजेल तोपर्यंत काही जण जिवंत जळून मेले, तर काही गुदमरून मरण पावले. मृतांमध्ये ईश्वर सिंग सिसोदिया (45), नीतू सिसोदिया (45), आशिष (30), गौरव (38), आकांक्षा (25) यांचा समावेश आहे. मृतांमध्ये 40 आणि 45 वयोगटातील दोघांची ओळख पटलेली नाही. मृतांमध्ये एका जोडप्याचाही समावेश आहे.

आगीने लगेचच भीषण रूप धारण केले. कोणालाही सावरण्याची संधी मिळाली नाही. झोपेतून जागे झालेल्या लोकांना काही समजेल तोपर्यंत त्यांचा गुदमरून मृत्यू झाला.
आगीने लगेचच भीषण रूप धारण केले. कोणालाही सावरण्याची संधी मिळाली नाही. झोपेतून जागे झालेल्या लोकांना काही समजेल तोपर्यंत त्यांचा गुदमरून मृत्यू झाला.

शेजारीच घराचे सुरू होते बांधकाम, तीन दिवसांपूर्वीच आले होते

मिळालेल्या माहितीनुसार, रात्री वीजपुरवठा खंडित झाला होता, मात्र वीज येताच पार्किंगच्या मीटरला आग लागली. प्रत्यक्षदर्शी एहसान पटेल यांनी सांगितले की, रात्री 3 वाजण्याच्या सुमारास आम्हाला आवाज ऐकू आला. मी बाहेर पाहिले तर इमारतीला आग लागली होती. आम्ही बादल्यांनी पाणी आणून आग विझविण्याचा प्रयत्न केला. माझा भाऊ या इमारतीत राहतो. याशिवाय काही विद्यार्थी आणि इतर कुटुंबेही तेथे राहतात. तीन-चार दिवसांपूर्वी काही पाहुणेही आले होते.

अग्निशमन दलाच्या जवानांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय नगरच्या स्वर्णबाग कॉलनीतील एका दुमजली इमारतीत आग लागल्याची माहिती आम्हाला रात्री 3 वाजता मिळाली. माहिती मिळताच पथक तत्काळ रवाना झाले. येथे आग तातडीने आटोक्यात आणण्यात आली, मात्र काही लोकांचा मृत्यू झाला होता. इमारतीच्या पार्किंगमध्ये लावलेल्या मीटरमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने ही आग लागल्याचे समजते. वाहनांना आग लागल्याने या आगीने भीषण रूप धारण केले. त्यांनी सांगितले की, या इमारतीत विद्यार्थ्यांसह कुटुंबेही राहत असल्याचे सांगण्यात येत आहे.

माहिती मिळताच अग्निशमन दलाचे वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात आली.
माहिती मिळताच अग्निशमन दलाचे वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात आली.
बातम्या आणखी आहेत...