आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलींची मुलीला बेदम मारहाण:इंदूरमध्ये डोळे वटारून पाहिल्याच्या क्षुल्लक कारणामुळे झाला वाद, पाहा VIDEO

इंदूर5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपण सोशल मीडियावर महिला, तरुणींच्या फ्री स्टाइल हाणामारीचे अनेक व्हिडीओ पाहिले आहेत. मुंबई लोकल ट्रेनमधील मारामारी असो किंवा रस्त्यावरील तरुणांचा राडा असो. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या मुलींनी एकमेकींचे केस ओढले, तर कुणी कपडे...

इंदूरच्या MIG भागात 4 मुलींनी एका मुलीला बेदम मारहाण केली. थक्क करणारी गोष्ट म्हणजे ही मारहाण सुरू असताना तिथे उपस्थित असणाऱ्या लोकांनी हे भांडण सोडवण्याऐवजी त्याचा व्हिडिओ करण्याला प्राधान्य दिले. या प्रकरणी पीडितेने एमआयजी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. आता पोलिस मारहाण करणाऱ्या तरुणींचा शोध घेत आहेत.

यासंबंधीच्या वृत्तानुसार, शुक्रवारी रात्री एलआयजी चौकात ही घटना घडली. याचा व्हिडिओ सोमवारी प्रकाशझोतात आला. TI अजय वर्मा यंच्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री आरजे कचोरीच्या समोर प्रिया वर्मा चहा घेण्यासाठी आली होती. त्यावेळी तिची तिथे उभ्या असणाऱ्या मेघा मालवीय, टीना सोनी, पुनम अहिरवार व अन्य मुलींशी टक लावून पाहण्यावरून वाद झाला. हा वाद एवढा वाढला की 4 मुलींच्या गटाने प्रिया वर्माला रस्त्यावर आडवे पाडून मारहाण केली. तिचा मोबाइलही फोडला.

आरोपी मुली महू व आसपासच्या

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांची FRV घटनास्थळी पोहोचली. तोपर्यंत मारहाण करणाऱ्या तरुणी तेथून पसार झाल्या होत्या. आरोपी तरुणी महू व आसपासच्या गावांतील असल्याचे सांगण्यात येते. पोलिसांनी शुक्रवारी रात्रीच या प्रकरणी त्यांच्याविरोधात मारहाणीसह मोबाइल फोडण्याच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, या प्रकरणी अद्याप कुणालाही अटक झाली नाही.

बातम्या आणखी आहेत...