आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलींमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी VIDEO:उज्जैनची घटना; इंदूरहून दर्शनासाठी आल्या होत्या उज्जैनला, शुट करणाऱ्याचा मोबाईलही फोडला

उज्जैन4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

उज्जैनमधील महाकाल मंदिराजवळील हरसिद्धी चौकात मुलींमध्ये वाद झाल्यानंतर हाणामारी झाली. या घटनेचा व्हिडिओ सद्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये चार मुली एका तरूणाला भांडताना दिसत आहेत. दरम्यान, मुलींना देखील शिवीगाळ होत असल्याचे व्हिडिओत ऐकायला येत आहे. त्यांच्यातील भांडण कशामुळे सुरू झाले, याचे अद्याप कारण स्पष्ट झाले नाही. ही घटना शनिवारी घडल्याचे सांगितले जात आहे.

इंदूरहून महाकाल दर्शनासाठी उज्जैनला आलेल्या चार मुली आणि दोन मुलांमध्ये वाद झाला. यानंतर हरसिद्धी मंदिर चौकाजवळ अशी हाणामारी झाली की, लोकांची झुंबड उडाली. लोकांनी फक्त व्हिडिओ बनवले. याप्रकरणी महाकाल पोलिस ठाण्यात कोणीही फिर्याद दिलेली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

व्हिडिओ बनवणाऱ्यालाही मारहाण करण्यात आली

हरसिद्धी चौकाजवळ रात्री झालेल्या वादाचा व्हिडीओ बनवत असताना एका तरुणाने मोबाईलची लाईट चालू केली. हे पाहून वाद घालणाऱ्या तरुणीला त्या तरूणाचा राग आला आणि तिने मोबाईलवरल शुटींग करणाऱ्यास शिवीगाळ केली, हाताचा फटका देत तो मोबाईल जमीनीवर पाडला. त्यानंतर काही लोक समजावयला गेले तर त्यांना देखील त्या मुली भांडू लागल्या.

इंदूरमध्ये पबमधून बाहेर पडलेल्या मुलीचा गोंधळ, महिला दल उशिरा आल्याने फटकारले

मुलगी इतकी नशेत होती की ती कोणाचे एकही ऐकायला तयार नव्हती.
मुलगी इतकी नशेत होती की ती कोणाचे एकही ऐकायला तयार नव्हती.

शनिवारी रात्री उशिरा नशेत असलेल्या एका तरुणीने इंदूरमधील सी-21 मॉलसमोरील पबमधून गोंधळ घातला. घटनास्थळी पोहोचलेले अतिरिक्त डीसीपी राजेश व्यास यांनी तिला खूप समजावले, पण ती इतकी नशेत होती की, ती काही ऐकायला तयार नव्हती.

मुलीला हाताळण्यासाठी व्यास यांनी विजय नगर पोलिस ठाण्यातून महिला दलाला पाचारण केले, मात्र 15 मिनिटांपर्यंत एकही महिला पोलिस पोहोचली नाही. त्यावर त्यांनी विजय नगर पोलिस ठाण्याच्या संपूर्ण कर्मचाऱ्यांना खडसावले आणि सांगितले की, कोणत्याही घटनेत 15 मिनिटांचाही रिस्पॉन्स टाइम ठेवला नाही तर घटना थांबणार कशा. त्यानंतर एसआय कुशवाह घटनास्थळी आले. मुलीच्या माहितीवरून तिचा मित्र आणि प्रियकर शोधून त्यांना पोलीस ठाण्यात आणले. आरोपी प्रियकर संजीव वडील प्रभात डे (रा. यादव नगर) याच्यावर 151 ची प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.

बातम्या आणखी आहेत...