आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Indore Is The Fourth Cleanest In The Country, Surat Is Second And Navi Mumbai Is Third

स्वच्छता सर्वेक्षण:इंदूर सलग चौथ्यांदा देशात सर्वात स्वच्छ, सुरत दुसऱ्या स्थानी, नवी मुंबईला तिसरे स्थान

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • महाराष्ट्राला देशात सर्वाधिक 17 पुरस्कार

स्वच्छ शहरांच्या स्पर्धेत मध्य प्रदेशातील इंदूरने पुन्हा एकदा बाजी मारत सलग चौथ्यांदा देशातील सर्वात सुंदर शहर म्हणून बहुमान पटकावला आहे. केंद्रीय नगरविकास मंत्रालयाने गुरुवारी स्वच्छता सर्वेक्षणाचा निकाल जाहीर केला. दुसऱ्या क्रमांकावर गुजरातमधील सुरत व तिसऱ्या स्थानी नवी मुंबईने स्थान पटकावले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लोकसभा मतदारसंघ असलेले वाराणसी गंगा नदीकाठावरील सर्वात स्वच्छ शहर ठरले. निकाल जाहीर करताना केंद्रीय नगरविकासमंत्री हरदीपसिंह पुरी यांनी इंदूरच्या जनतेचे आभार मानले. १० लाख किंवा त्यापेक्षा अधिक लोकसंख्येच्या ४७ शहरांत झालेल्या सर्व्हेत बिहारची राजधानी पाटणा सर्वात अस्वच्छ शहर ठरले. देशातील सर्वात स्वच्छ राजधानी म्हणून नवी दिल्ली अव्वल स्थानी आहे. शंभरपेक्षा अधिक शहरे असलेल्या राज्यांत छत्तीसगड सर्वात स्वच्छ राज्य ठरले, तर शंभरपेक्षा कमी शहरे असलेल्या राज्यांत झारखंडला हा मान मिळाला.

या ९ मापदंडांवर झाले सर्वेक्षण
*वर्गवारी करत कचरा जमा करणे व त्यानुसार वाहतुकीचे नियोजन * प्रक्रिया व विल्हेवाट. * दूषित पाणी शुद्ध करणे व त्याचा वापर. तीन सिद्धांत : कचरा कमी करणे, पुनर्वापरासह रिसायकलिंगवर भर. * पर्यावरणातील प्रदूषणात घट आणणे. * कचरा वेचकांच्या स्थितीत सुधारणा. * जेमच्या माध्यमातून खरेदीला चालना देणे. * गंगा नदीलगतच्या शहरांत स्वच्छतेसाठी उपाययोजना.
* स्वच्छतेवर तंत्रज्ञानाच्या आधारे देखरेखीवर भर.

२८ दिवस पेपरलेस आणि डिजिटल पद्धतीने करण्यात आला सर्व्हे
* १.९ कोटी लोकांकडून फीडबॅक. * १ लाखापेक्षा जास्त लोकसंख्येच्या शहरांत उत्तर प्रदेशातील शहाजहानपूर येथे सर्वाधिक लोकांनी सर्व्हेत भाग घेतला. * विविध श्रेणींत देशात ४ राष्ट्रीय पुरस्कारांसह इतर १३ असे एकूण सर्वाधिक १७ पुरस्कार * उत्तराखंडातील नंदप्रयागमध्ये सर्वाधिक लोकांचा सहभाग.

जगातील सर्वात मोठे स्वच्छता अभियान : केंद्रीय शहरविकास मंत्रालयाने २०१६ मध्ये हे सर्वेक्षण सुरू केले होते. तेव्हा यात केवळ ७३ शहरांचा समावेश होता. गेल्या वर्षी या सर्वेक्षणात ४२३७ शहरे सामील झाली. यंदा यात आणखी पाच शहरे वाढली. आता हे जगातील सर्वात मोठे सर्वेक्षण ठरले आहे.

स्वच्छता अॅपवर १.७ कोटी नोंदणी
स्वच्छता सर्वेक्षण २०२० साठी सुमारे १.७ कोटी लोकांनी स्वच्छता अॅपवर नोंदणी केली होती. तसेच साेशल मीडियावर ११ कोटींपेक्षा जास्त लोक सहभागी झाले. साडेपाच लाखांपेक्षा जास्त स्वच्छता कर्मचारी सामाजिक कल्याणाच्या योजनांत सहभागी होते.

औरंगाबाद २६ व्या स्थानावर
- २५ ते ५० हजार लोकसंख्या गटात शिर्डी देशात दुसरे तर पश्चिम विभागात सर्वात स्वच्छ शहर म्हणून प्रथम क्रमांक
- शाश्वत स्वच्छता ठेवणाऱ्या श्रेणीत इंदापूरला पुरस्कार
- १० लाख लोकसंख्या असलेल्या शहरात महाराष्ट्राची ९ शहरे
- एक लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरांत कराड प्रथम, सासवड िद्वतीय आणि लोणावळ्यास तृतीय क्रमांक
- स्वच्छतेत नावीन्यपूर्ण काम करणाऱ्या श्रेणीत अकोले शहरास पुरस्कार.
- १० लाखांपेक्षा अधिक लोकसंख्येत नवी मुंबई तृतीय,नाशिक ११, ठाणे १४, पुणे १५ तर औरंगाबाद २६ वे.

देशातील टॉप टेन स्वच्छ शहरे
इंदूर
सुरत
नवी मुंबई
विजयवाडा
अहमदाबाद
राजकोट
भोपाळ
चंदीगड
विशाखापट्टणम
बडोदा

देशातील टॉप टेन अस्वच्छ शहरे
पाटणा
पूर्व दिल्ली
चेन्नई
कोटा
उत्तर दिल्ली
मदुराई
मीरत
कोइम्बतूर
अमृतसर
फरिदाबाद

बातम्या आणखी आहेत...