आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Indore Temple Accident Updates; Beleshwar Mahadev Mandir Demolition | Bajrang Dal

36 जणांच्या मृत्यूनंतर इंदूरच्या बेलेश्वर मंदिरावर बुलडोझर:महापालिकेने काढले अतिक्रमण, आणखी 3 धार्मिक स्थळांवर कारवाई

इंदूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंदूरमधील बेलेश्वर मंदिराचे अतिक्रमण काढताना महापालिकेचे पथक सोमवारी. - Divya Marathi
इंदूरमधील बेलेश्वर मंदिराचे अतिक्रमण काढताना महापालिकेचे पथक सोमवारी.

मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये बेलेश्वर मंदिराचा बेकायदेशीरपणे बांधलेला भाग सोमवारी सकाळी महापालिकेने पाडला. रामनवमीच्या मुहूर्तावर या मंदिरातील विहिरीचे छत कोसळून 36 जणांचा मृत्यू झाला होता. अतिक्रमण काढण्यासाठी महापालिकेचे कर्मचारी सकाळी सहा वाजेपासूनच मंदिरात पोहोचू लागले होते.

मंदिराचे अतिक्रमण हटवल्याच्या विरोधात बजरंग दल आणि हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. मंदिराबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. लिड वाला कुआं, सुखलिया, गडरखेडी येथील धार्मिक स्थळांचे अतिक्रमणही प्रशासनाने हटवले.

गुरुवारी रामनवमीच्या हवनाच्या वेळी मंदिरातील विहिरीचे छत कोसळल्याने 60 जण कोसळले होते. काही जण स्वतःहून बाहेर आले आणि 20 जणांना वाचवण्यात यश आले.

महापालिकेच्या कारवाईची 6 छायाचित्रे...

इंदूरमध्ये सोमवारी सकाळी महापालिकेने कारवाई करत अनेक धार्मिक स्थळांवरील अतिक्रमणे हटवली. यादरम्यान बेलेश्वर महादेव मंदिरावरील अतिक्रमणही हटविण्यात आले.
इंदूरमध्ये सोमवारी सकाळी महापालिकेने कारवाई करत अनेक धार्मिक स्थळांवरील अतिक्रमणे हटवली. यादरम्यान बेलेश्वर महादेव मंदिरावरील अतिक्रमणही हटविण्यात आले.
दुर्घटनेनंतर दुसऱ्या दिवशी मंदिराला कुलूप होते. येथे येण्यावर बंदी घालण्यात आली होती. सोमवारी सकाळी मंदिराचे कुलूप उघडून अतिक्रमण काढण्याची कारवाई करण्यात आली.
दुर्घटनेनंतर दुसऱ्या दिवशी मंदिराला कुलूप होते. येथे येण्यावर बंदी घालण्यात आली होती. सोमवारी सकाळी मंदिराचे कुलूप उघडून अतिक्रमण काढण्याची कारवाई करण्यात आली.
बेलेश्वर महादेव मंदिराचे बेकायदा बांधकाम हटविण्याची कार्यवाही महापालिकेने सुरू केली असता आजूबाजूचे काही लोक विरोध करत तेथे पोहोचले. अधिकाऱ्यांनी त्यांना समज देऊन शांत केले.
बेलेश्वर महादेव मंदिराचे बेकायदा बांधकाम हटविण्याची कार्यवाही महापालिकेने सुरू केली असता आजूबाजूचे काही लोक विरोध करत तेथे पोहोचले. अधिकाऱ्यांनी त्यांना समज देऊन शांत केले.
मंदिराचे बेकायदा बांधकाम पाडण्याची कारवाई केल्याबद्दल बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या विरोधात निदर्शने केली.
मंदिराचे बेकायदा बांधकाम पाडण्याची कारवाई केल्याबद्दल बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या विरोधात निदर्शने केली.
गडरखेडी धार्मिक स्थळावर दुकान थाटले होते. दुकान काढताच तिथून पायवाटेचा रस्ता बाहेर आला. महापालिकेने तातडीने येथून अतिक्रमण हटविले आहे.
गडरखेडी धार्मिक स्थळावर दुकान थाटले होते. दुकान काढताच तिथून पायवाटेचा रस्ता बाहेर आला. महापालिकेने तातडीने येथून अतिक्रमण हटविले आहे.

12 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज, 6 जणांवर उपचार सुरू

अपघातात जखमी झालेल्या 12 जणांना भंवरकुआन येथील अॅपल रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. 6 जण अजूनही दाखल आहेत. या दुर्घटनेप्रकरणी मंदिर ट्रस्टचे सचिव मुरली सबनानी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून शनिवारी त्यांच्या डाव्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. तेही धोक्याबाहेर आहेत.

जाणून घ्या बेकायदेशीर ताबा ते अपघातापर्यंतचे तीन मोठे मुद्दे...

1. मंदिराशी संबंधित लोक म्हणाले- विहीर बुजवली नव्हती

मंदिर जुने आहे. पूर्वी ते खूपच छोटे होते. त्याच्या विस्ताराची योजना सुमारे 25 वर्षांपूर्वी करण्यात आली होती. विहीर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. ट्रस्टने विहीर बुजवली नाही, फक्त छत टाकले. त्यावर टाइल्स लावण्यात आल्या. म्हणजे जिथे लोक रोज दर्शनासाठी उभे होते तिथे खाली जमीन पोकळ होती. येथेच रामनवमीच्या आरतीवेळी गर्दी जमल्याने हा अपघात झाला.

2. विहिरीच्या पोकळ भागाजवळ बेकायदेशीर बांधकाम

जी विहीर न बुजवता त्यावर फक्त छत टाकले होते. त्या विहिरीजवळ दोन वर्षांपूर्वी नवीन बांधकाम सुरू करण्यात आले. या बेकायदा बांधकामावर महापालिकेने आक्षेप घेतला, मात्र कारवाई केली नव्हती.

3. राजकीय हस्तक्षेपामुळे कारवाईला विलंब होत राहिला

महापालिकेने या विहिरीबाबत कधीही नोटीस दिली नाही. नवीन बांधकाम बेकायदेशीर मानून ते थांबविण्यास सांगितले, मात्र कारवाई झाली नाही. यामागे भाजपच्या एका बड्या नेत्याचा राजकीय दबाव होता, हे अधिकारी मान्य करत आहेत.

रामनवमीच्या दिवशी मंदिरात घडलेल्या घटनेनंतरचे दृश्य. विहिरीत पडलेल्या लोकांनी कसे तरी भिंतीला आणि काठ्यांना लटकवून जीव वाचवला होता.
रामनवमीच्या दिवशी मंदिरात घडलेल्या घटनेनंतरचे दृश्य. विहिरीत पडलेल्या लोकांनी कसे तरी भिंतीला आणि काठ्यांना लटकवून जीव वाचवला होता.

भक्तांना माहीत नव्हते, खाली एक विहीर आहे...

स्नेहनगरचे रहिवासी आणि प्रत्यक्षदर्शी जीतू भाई यांनी 'दैनिक भास्कर'ला सांगितले की, मलाही कन्यापूजनासाठी कुटुंबातील मुलींना घेऊन जावे लागले. विहीर कोसळल्याची माहिती मिळताच मी घराबाहेर पडलो. आम्ही वर्षानुवर्षे येथे येत आहोत. सुमारे 20 वर्षांपूर्वी विहीर झाकण्यात आली. पण विहीर पूर्णपणे न बुजवता फक्त छत टाकण्यात आले होते. गर्डर कमकुवत असल्याने भार सहन झाली नाही म्हणून विहीरीचे छत कोसळले.

20 वर्षांपासून मंदिरात दर्शनासाठी येणारे भक्त दिनेश माकिजा सांगतात की, खाली एक विहीर असल्याचे त्यांना माहीत नव्हते. ती आधीच बुजवायला पाहिजे होती. मंदिर परिसर मोठा होत असल्याची माहिती होती, त्यामुळे बांधकाम सुरू होते.