आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Industrialist Rajinikanth Shroff Has Been Awarded Padma Bhushan, Sindhutai, Girish Prabhune And 102 Padmashri

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पद्म पुरस्कार:उद्योगपती रजनीकांत श्रॉफ यांना पद्मभूषण, सिंधुताई, गिरीश प्रभुणेंसह 102 जणांना पद्मश्री

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 7 पद्मविभूषण, 10 पद्मभूषण, पुरस्कार विजेत्यांमध्ये 29 महिला

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून युनिफॉस कंपनीचे रजनीकांत श्रॉफ यांना पद्मभूषण तर ज्येष्ठ समाजसेविका व अनाथांची आई म्हणून ओळख असलेल्या सिंधूताई सपकाळ यांच्यासह महाराष्ट्रातील ५ जणांना पद्मश्री पुरस्कार जाहिर झाला आहे.

जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असून आबेंसह एकूण एकूण ७ जणांना पद्मविभूषण, १० जणांना पद्मभूषण, तर १०२ जणांना पद्मश्री पुरस्कार घोषित झाले आहेत. पद्मविभूषण पुरस्कार प्राप्त मान्यवरांमध्ये एस.पी. बालसुब्रह्मण्यम (मरणोत्तर), डॉ.नरिंदर सिंह कपानी आणि सुदर्शन साहू यांचा समावेश आहे. दरम्यान, सिंधुताई सपकाळ यांच्यासह राज्यातील ज्येष्ठ समाजसेवक गिरीश प्रभुणे, कला क्षेत्रातील योगदानासाठी परशुराम गंगावणे, शिक्षण व साहित्यातील योगदानासाठी नामदेव सी.कांबळे,लिज्जत पापडच्या संस्थापिका जसवंतीबेन पोपट यांनाही यंदाचा पद्मश्री पुरस्कार जाहिर झाला आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठाकर समाजाचे परशुराम गंगावणे यांना कला क्षेत्रातील पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. कळसूत्री बाहुल्या ही लोककला जपून समाजामध्ये जनजागृती आणि प्रबोधन केल्यामुळे गंगावणे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. जसवंती जमनादास पोपट या महाराष्ट्रातील प्रसिद्ध लिज्जत पापडच्या संस्थापक आहेत. रजनीकांत देविदास श्रॉफ हे एक अब्जाधीश उद्योगपती आहेत. राजू श्रॉफ या नावाने ते ओळखले जातात. ते युनिफॉस लि. कंपनीचे संस्थापक आहेत. एकूण ११९ जणांना पद्म पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. यात लोक जनशक्ती पार्टीचे नेते रामविलास पासवान यांना मरणोत्तर पद्मभूषण तर तरुण गोगोई, माजी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनाही पद्मभूषण पुरस्कार जाहिर झाला आहे.

पद्म पुरस्कार विजेते
रजनीकांत देविदास श्रॉफ – पद्मभूषण (व्यापार), परशुराम आत्माराम गंगावणे – पद्मश्री (कला), नामदेव सी. कांबळे – पद्मश्री (शिक्षण आणि साहित्य), जसवंतीबेन जमनादास पोपट – पद्मश्री (व्यापार आणि व्यवसाय), गिरीश प्रभुणे, सिंधुताई सपकाळ – पद्मश्री (सामाजिक कार्य).