आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Infection Is Less Than 15% In India, But Death Is More Than 70%! The Highest Number Of Deaths In Twenty four Hours In Brazil

महामारी:भारतापेक्षा संसर्ग सव्वा टक्का कमी, पण मृत्यू ७० टक्क्यांहून जास्त! ब्राझीलमध्ये चोवीस तासांत सर्वाधिक मृत्यू

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • ब्राझीलचे राष्ट्रप्रमुख बोल्सोनारो यांची कोरोनाबद्दलची बेपर्वाई देशाला संकटात टाकण्यासाठी कारणीभूत ठरल्याचे तज्ज्ञांना वाटते.

कोरोना महामारीचा प्रचंड फटका बसलेल्या देशांच्या यादीत ब्राझील सर्वात वरच्या स्थानी आहे. बुधवारी गेल्या चोवीस तासांत एका दिवसात देशात सर्वाधिक मृत्यू (१९५४) झाल्याची नोंद आहे. भारत व ब्राझीलची तुलना केल्यास आकडे चकित करणारे आहेत. सध्या भारतात कोरोनाचे एकूण बाधित १ कोटी ११ लाख २५ हजार १७ आहेत. ब्राझीलमध्ये १ कोटी १२ लाख ६२ हजार ७०७ आहेत. म्हणजेच ब्राझीलमध्ये एकूण बाधितांचे प्रमाण भारताच्या तुलनेत १.२५ टक्के कमी आहे. मात्र ब्राझीलमधील कोरोनामुळे झालेल्या मृतांची एकूण संख्या २.६८ लाख आहे. भारतात १.५८ लाख मृत्यू झाले. ब्राझीलमधील मृतांचे हे प्रमाण ७० टक्के जास्त आहे.

ब्राझीलचे राष्ट्रप्रमुख बोल्सोनारो यांची कोरोनाबद्दलची बेपर्वाई देशाला संकटात टाकण्यासाठी कारणीभूत ठरल्याचे तज्ज्ञांना वाटते. संसर्गाच्या सुरुवातीपासूनच बोल्सोनारो बेजबाबदार विधाने व निर्णय घेत आले आहेत. ब्राझीलमध्ये योग्य वेळी मास्क अनिवार्य करण्यात आला नाही किंवा इतर नियमही कडक लागू करण्यात आले नव्हते. बोल्सोनारो यांनी सुरक्षेच्या उपाययोजनांबद्दलही गांभीर्य दाखवले नाही. अमेरिकेचे माजी अध्यक्ष ट्रम्प व बोल्सोनारो यांनी कोरोनाची परिस्थिती अत्यंत वाईट पद्धतीने हाताळल्याचे तज्ज्ञांना वाटते.

८० टक्क्यांवर आयसीयू भरले
ब्राझीलमधील आघाडीची आरोग्य संस्था फियोक्रूजने कोरोनामुळे देशाची आरोग्य यंत्रणा उद्ध्वस्त होण्याच्या उंबरठ्यावर असल्याचा इशारा दिला आहे. ब्राझीलच्या २७ राज्यांच्या २५ राजधान्यांमधील आयसीयू ८० टक्क्यांहून जास्त रुग्णांनी भरलेले आहेत. पोर्टो अलेग्रो व कम्पो ग्रेंडे या दोन शहरातील आयसीयूदेखील भरले आहेत. ब्राझील मानवतेसाठी संकट बनले आहे. मृत्यूंच्या बाबतीत अमेरिकेनंतर ब्राझील दुसऱ्या क्रमांकावर आहे.

केवळ ४ टक्के लोकांना डोस
ब्राझीलने अॅस्ट्राझेनेका व कोरोना वॅक लसीच्या २० कोटी डोसची ऑर्डर दिली आहे. परंतु आतापर्यंत आठ कोटी लोकांना डोस देता आला आहे. म्हणजेच लस दिलेली लोकसंख्या ४ टक्के आहे. अमेरिकेने ३० टक्क्यांहून जास्त लोकसंख्येला लसीचा पहिला डोस दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...