आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Corona | India | Update |Infection Under Control Even After Diwali; During The Festival, The Number Of Patients Is Low, But The Crisis Has Not Been Averted

दिव्य मराठी विशेष:दिवाळीनंतरही संसर्ग नियंत्रणात; सणासुदीत रुग्ण कमीच, संकट मात्र टळलेले नाही

पवनकुमार | नवी दिल्ली11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशात कोरोना संसर्गाच्या फैलावात सातत्याने घसरण येत आहे. शुक्रवारी देशात १०,३०२ नवे रुग्ण आढळले. सक्रिय रुग्णांची संख्याही घटून १,२४,८६८ वर आली आहे. ही गेल्या १७ महिन्यांतील सर्वात कमी सक्रिय रुग्णसंख्या आहे. पॉझिटिव्हिटी रेट ०.९६% आहे. १९ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात तर रोज होणाऱ्या मृत्यूंची संख्या शून्यावर आली आहे.

सणासुदीच्या हंगामाआधी म्हणजे नवरात्रीच्या सुरुवातीस दिवाळीनंतर कोरोना संसर्गात वाढ होण्याची शंका तज्ज्ञांनी व्यक्त केली होती. तथापि, कोराेनाच्या नव्या रुग्णांत सर्वात मोठा वाटा असलेल्या बड्या राज्यांत आढळणारे रुग्ण पाहिले तर वेगळे चित्र समोर येते. ७ ऑक्टोबरपासून नवरात्रीची सुरुवात झाली होती. तेव्हापासून कोरोनाचे बहुतांश रुग्ण असलेल्या राज्यांत नव्या रुग्णांत मात्र सातत्याने घटच होत असल्याचे निदर्शनास येत आहे.

तज्ज्ञांनुसार, कोरोना संसर्गाच्या सद्य: स्थितीकडे पाहून वाटते की कमीत कमी सणासुदीमुळे संसर्गाची शक्यता नाममात्र इतकीच आहे. त्यामागील सर्वात मोठे कारण म्हणजे, कोरोनाबाबत जनजागृती आणि त्यानुरूप वागणे बहुतांश लोकांना कळले आहे. लोक आता स्वत:च मोठ्या व गर्दीच्या सामाजिक समारंभांपासून स्वत:ला दूरच ठेवत आहेत. देशाच्या दृष्टीने ही चांगली बाब ठरली आहे.

केंद्र सरकारची सूचना
लस घेणाऱ्यांना गिफ्ट द्यावे, लकी ड्रॉद्वारे विजेत्याची करावी निवड : मुदत संपूनही लसीचा दुसरा डोस न घेणाऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी गिफ्ट दिले जाणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालय लवकरच राज्यांना हा सल्ला देणार आहे. लस घेणारे लकी ड्रॉमध्ये सहभागी होतील. दर १५ दिवसांनी विजेत्याची निवड होऊन त्यांना गिफ्ट देण्यात येईल.

कोरोनामुक्त वा लस घेतली असेल तर मोठ्या कार्यक्रमांत जाणे टाळा
देशात कोरोना संसर्गाची स्थिती?

कोरोना नव्या शिकारीच्या शोधात आहे. रुग्णसंख्या घटली आहे. सध्या कोरोना नियंत्रणात आहे. मात्र मुलांचे लसीकरण झालेले नाही. प्रौढांचेही डोस बाकी आहेत. अनेक राज्ये अनलॉक आहेत, बाजारांत गर्दी असूनही रुग्णवाढ कशी नाही?

संसर्ग मर्यादित राहण्याची २-३ मोठी कारणे आहेत :

मोठ्या लोकसंख्येत संसर्गानंतर अँटिबॉडी आल्याने त्यांना धोका कमी आहे.
७६ कोटी लोकांनी लसीचा किमान एक डोस तरी घेतलेला आहे. लोक कोविड उपयुक्त वर्तन करत आहेत. युरोप आणि अमेरिकेत लोक निष्काळजीपणा करत आहेत.

पुढेही असेच राहील का? तिसरी लाट येणार की नाही, अंदाज काय?
नाही! तूर्त हे सांगता येणार नाही. जीनोम सिक्वेन्सिंग होत आहे. यातून नवा व्हेरिएंट ओळखला जाईल. नव्या व्हेरिएंटमध्ये संसर्ग क्षमता जास्त असेल तर तिसऱ्या लाटेची शक्यता नाकारता येत नाही.

लग्नसराईतील सावधगिरी?
लस घेतली असेल वा कोरोनामुक्त झाला असाल तरीही कोरोना उपयुक्त वर्तनाचे पालन करा. फिजिकल डिन्स्टन्सिंग, मास्क मोठ्या कार्यक्रमांत जाणे टाळा. तेथे संसर्गाची शक्यता जास्त असते.

महाराष्ट्र व केरळची स्थिती कशी?
यात राज्यांतही रुग्ण कमी आहेत. तथापि, आजही ४०-५०% रुग्ण याच राज्यांत आहेत. येथे लस न घेतलेले व संसर्ग न झालेले लोक जास्त असल्यामुळे ही स्थिती उद्भवत आहे. आजही विषाणू फैलावलेला आहे. महिनाभरात स्थिती आणखी सुधारेल. तोवर लसीकरणही वाढेल.

हिवाळ्यात रुग्ण वाढू शकतात का?
गतवर्षीही हाच सवाल होता. फेब्रुवारीत रुग्ण कमी होते. देशात सर्वाधिक रुग्णसंख्या नोंद झाली. व्हायरसबाबत आपण कसे वागतो यावर त्याचा फैलाव अवलंबून असतो. आजवरच्या अनुभवांनुसार म्हटले जाऊ शकते की व्हायरसचा फैलाव व घटण्याचा हवामानाशी काहीही संबंध नाही. ते लस घेणे वा नियम पालनावर अवलंबून आहे.

अमेरिका, ब्रिटनमध्ये रुग्ण वाढत आहेत, भारतातही असे होईल का?
या देशांची रुग्णवाढ ही ९९% डेल्टा व्हेरिएंटमुळे होत आहे. लस न घेतलेल्या लाेकांमध्ये संसर्ग जास्त होत असल्याचे दिसले आहे. अमेरिका व युरोपात ३४ ते ४०% लोकसंख्येने अद्याप लस घेतलेली नाही. त्यांनाच जास्त अडचणी येत आहेत. भारतात अद्याप अशी स्थिती आलेली नाही.

कोरोनाची सद्दी संपतेय: ज्या राज्यांत जास्त रुग्ण होते, तेथेही आता वेगाने घटत आहेत नवीन रुग्ण

राज्य 7 ऑक्टोबर 21 ऑक्टोबर 4 नोव्हेंबर 18 नोव्हेंबर
केरळ 12,288 8,733 7,124 6,111
महाराष्ट्र 2,681 1,573 1,141 963
तामिळनाडू 1390 1164 945 775
प. बंगाल 771 833 918 860
आंध्र प्रदेश 643 493 301 222

बातम्या आणखी आहेत...