आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासात महिन्यांपासून किरकोळ महागाईतून दिलासा मिळाला. खाद्यतेल, पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी झाल्यामुळे एप्रिलमधील ७९ टक्क्यांच्या विक्रमी नीचांकी पातळीवरून मे महिन्यात किरकोळ महागाई ७.४%पर्यंत घसरली. अर्थतज्ज्ञांच्या ७.१०% च्या अंदाजापेक्षा कमी आहे, परंतु रिझर्व्ह बँकेच्या ६% च्या लक्ष्यापेक्षा जास्त. सरकार आणि रिझर्व्ह बँक दोघेही महागाई रोखण्यासाठी पावले उचलत होते. केंद्र सरकारने २१ मे रोजी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क ८ आणि ६ रुपयांनी कमी करण्याचा निर्णय घेतला होता. रिझर्व्ह बँकेने धोरणात्मक दरात वाढ केली होती. बँक ऑफ बडोदाचे मुख्य अर्थतज्ञ मदन सबनवीस म्हणतात, रिझव्र्ह बँक आणि केंद्र सरकारने केलेल्या उपाययोजनांव्यतिरिक्त, बेस इफेक्टमुळे किरकोळ महागाईदेखील कमी झाली आहे. येत्या महिन्यांतही मदत होईल. खाद्यतेल, मसाले, भाज्यांमध्ये फारसा दिलासा नाही. सबनवीस म्हणाले, राज्यांमध्ये किरकोळ महागाई ७% पेक्षा जास्त नोंदवली गेली. खरीप पिकांच्या एमएसपीमध्ये वाढ झाल्यामुळे पीक आले तरी अन्नधान्य महागाई वाढण्याची अपेक्षा आहे. जूनमध्ये महागाई दर ६. ७५-७% च्या श्रेणीत राहील. केअरएजच्या मुख्य अर्थतज्ञ रजनी सिन्हा यांचाही विश्वास आहे की क्रूड आणि कमोडिटीच्या किमतीत वाढ झाल्यामुळे पुढील काही महिन्यांसाठी महागाई दर आरबीआयच्या लक्ष्यापेक्षा जास्त राहील.
या किमती कमी झाल्यामुळे महागाईत घट
वस्तू एप्रिल मे खाद्यतेल 17.28% 13.26% इंधन 10.80% 9.54% मसाले 10.56% 9.93% खाद्यान्न 8.19% 7.84% पण मांस, मासे आणि भाज्या महागल्या भाज्या 15.41% 18.26% मीट-फिश 6.97% 8.23%
ऑगस्टमध्ये दर ०.२५ % वाढवून थांबवू शकते रिझर्व्ह बँक
मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसचे मुख्य अर्थतज्ज्ञ निखिल गुप्ता म्हणतात की, महागाईची आकडेवारी बाजाराच्या अपेक्षेपेक्षा चांगली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीतील ७.५% च्या अंदाजापेक्षा हे कमी आहे. ऑगस्टमध्ये धाेरणात्मक दर २५ बेसिस पॉइंट्सने वाढू शकतात. त्यानंतर रिझर्व्ह बँक वाढीला थोडा विराम देईल. हेदेखील शक्य आहे की रिझर्व्ह बँक ऑगस्टमध्ये दरवाढ करणार नाही आणि दर वाढवण्यापूर्वी परिस्थितीचा विचार करेल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.