आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Inflation Higher In Rural Than Urban Areas In July August, Crosses RBI's Laxman Line

महागाई:जुलै-ऑगस्ट महिन्यांमध्ये शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात जास्त महागाई, रिझर्व्ह बँकेची लक्ष्मणरेषा ओलांडली

नवी दिल्ली22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सलग तीन महिन्यांमध्ये घट झाल्यानंतर ऑगस्ट महिन्यात महागाईचा दर पुन्हा ७ टक्क्यांवर गेला आहे. जुलै महिन्यात तो ६.७ टक्के होता. बरोबर एक वर्षापूर्वीशी तुलना केल्यास म्हणजे ऑगस्ट २०२१ मध्ये हा दर ५.३० टक्के होता. विशेष म्हणजे जुलै आणि ऑगस्ट महिन्यात शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात महागाई जास्त होती.

सोमवारी ग्राहक मूल्य निर्देशांकावर (सीपीआय) आधारित किरकोळ महागाईचे दर जाहीर झाले. या आकडेवारीनुसार खाद्यपदार्थांच्या साहित्याच्या किमती वाढल्याने महागाईत भर पडली आहे. सलग आठव्या महिन्यात किरकोळ महागाईचे आकडे रिझर्व्ह बँकेच्या अपेक्षेपेक्षा जास्त आले आहेत. रिझर्व्ह बँकेने २ ते ६ टक्के दरम्यान महागाई आटोक्यात ठेवण्याचे लक्ष्य ठेवले होते. ऑगस्ट महिन्यात ग्रामीण भागात महागाई ७.१५ टक्के होती. शहरी भागात तुलनेने कमी म्हणजे ६.७२ टक्के राहिली. जुलै महिन्यात ग्रामीण भागात महागाई ६.८० तर शहरी भागात ६.४९ टक्के होती. ऑगस्ट महिन्यात डाळ -तांदूळ सारखे धान्य आणि भाज्यांच्या दरात जबर वाढ झाली. गेल्या महिन्यात खाद्य महागाई ७.६२ टक्के राहिली.

महिनामहागाई दर एप्रिल७.७९ मे७.०४ जून७.०१

महिनामहागाई दर जुलै६.७१ ऑगस्ट७.०% (आकडेवारी टक्क्यांत)

बातम्या आणखी आहेत...