आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Inflation Hits General Again, Rs 250 Hike In Commercial LPG Prices | Marathi News

महागाई वाढली:सामान्यांना पुन्हा महागाईचा झटका, व्यावसायिक एलपीजीच्या दरात 250 रुपयांची वाढ

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सामान्यांना पुन्हा महागाईचा झटका बसला. १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात २५० रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे दिल्लीत एका सिलिंडरची किंमत २,२५३ रुपये झाली आहे. आधी ही किंमत २,००३ रुपये होती. पाच महिन्यांत १९ किलोचे सिलिंडर ७२० रुपयांनी महाग झाले आहे. गेल्या नोव्हेंबरमध्ये २६५ रुपये आणि डिसेंबरमध्ये १०० रुपये वाढले होते.

या वर्षी १ मार्चलाही १०५ रुपये वाढले. पीएनजीच्या दरात ५.८५ रुपये प्रति एससीएम वाढ झाली आहे. ही वाढ १६% आहे. विमानात वापरण्यात येणाऱ्या एटीएफच्या दरात २% वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतीत सतत वाढ होत असल्याने या वर्षी ९ वेळा एटीएफचा दर वाढवण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...