आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजगाच्या तुलनेत भारतात महागाई अत्यंत नगण्य व नियंत्रित असल्याचा दावा भाजप प्रवक्ते व खासदार सुधांशू त्रिवेदी यांनी केला आहे. 'देशात महागाई काहीशी वाढली. पण ती नियंत्रणात ठेवण्यात सरकारला यश आले आहे,' असे ते म्हणालेत. त्यांच्या या विधानावर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
सुधांशू त्रिवेदी यांनी शनिवारी रायपूरमध्ये महागाईच्या मुद्यावर पत्रकारांशी संवाद साधला. त्यात ते म्हणाले - 'भारतच नव्हे तर संपूर्ण जग महागाईचा मार सहन करत आहे. केवळ श्रीलंका व पाकिस्तानच नाही, तरर चीनच्या यूनान प्रांतातही बँकांचे व्यवहार बंद करण्यात आलेत. तिथे रणगाडे तैनात करण्यात आलेत. ब्रिटन व युरोपातही महागाई 40 वर्षांत प्रथमच टोकाला पोहोचली आहे. अमेरिकेतही 45 वर्षानंतर अशी स्थिती उद्भवली आहे. याऊलट भारतात महागाईचा दर केवळ 8.5 टक्के आहे. जगातील सर्वात मोठ्या देशांच्या तुलनेत हा सर्वात कमी आहे. युक्रेन युद्ध व कोरोना महामारीमुळे असे घडले आहे.'
त्रिवेदी यानी यावेळी मागील यूपीए सरकारच्या काळातील महागाईचीही आठवण करून दिली. ते म्हणाले, 'आज एलपीजी सिलिंडरचे दर अकराशेच्या आसपास आहेत. जानेवारी 2014 मध्ये हेच सिलिंडर 1241 रुपयांना मिळत होते. पण आम्ही एवढ्या वाईट स्थितीतही महागाईला त्या पातळीपर्यंत जाऊ दिली नाही. 2009 नंतर भारतातील महागाई दर 12 व साडेदहा टक्के होता. म्हणजे दुहेरी आकड्यात. पण आम्ही ती एकेरी आकड्यातच नियंत्रणात ठेवली. देशात महागाई नाही असे नाही, पण जगाच्या तुलनेत येथील कुशल नेतृत्वामुळे तिचे चांगले व्यवस्थापन करण्यात केंद्र सरकारला यश आले आहे.'
तज्ज्ञांचा महागाईवर इशारा
ब्लूमबर्गच्या एका सर्वेनुसार, भारतात मंदी येण्याची कोणतीही शक्यता नाही. क्रिसिलचे मुख्य अर्थतज्ज्ञांच्या माहितीनुसार, 'अमेरिकेच्या मंदीचा प्रभाव भारतात दिसू शकतो. यामुळे भारताची निर्यात कमी होऊ शकते. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताला व्यापार करण्यासाठी डॉलर्सची गरज असते. काही देश वगळले तर जगभरातील सर्वच देश भारतासोबत डॉलर्समधूनय सामानाची आयात-निर्यात करतात. त्यामुळे भारताच्या आयातीच्या खर्च आणखी वाढू शकतो. डॉलरच्या चढ्या दरामुळे व रुपयाच्या घसरणीमुळे ही स्थिती आणखी बिकट होऊ शकते.'
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.