आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारतीय रिझर्व्ह बँकेचे (आरबीआय) गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी ऑक्टोबरचा महागाई दर ७% पेक्षा कमी राहण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. ते म्हणाले, सरकार आणि आरबीआयने महागाई रोखण्यासाठी ६-७ महिन्यांत जी पावले उचलली त्याचा परिणाम सोमवारी जाहीर होणाऱ्या ऑक्टोबरच्या आकड्यांत पाहायला मिळेल. आम्ही महागाई दर ४% पर्यंत आणण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. दास म्हणाले, महागाई २-६ टक्क्यांच्या आत ठेवण्याचे उद्दिष्ट बदलण्याची गरज नाही. कारण ६% पेक्षा अधिक महागाई दर आर्थिक वृद्धीवर परिणाम करेल. या वर्षी महागाई दर सातत्याने वर राहिला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.