आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहवामानातील बदलामुळे संपूर्ण देशात इन्फ्लूएंझा (फ्लू)ची समस्या दिसून येत आहे. दरम्यान, इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने स्पष्ट केले आहे की, राजधानी दिल्ली-एनसीआरसह देशातील बहुतेक भागांमध्ये H3N2 विषाणूचा उद्रेक दिसून येत आहे. ज्यामुळे लोकांना तीव्र ताप आणि खोकला, सर्दीचा त्रास होत आहे. या संसर्गाच्या वाढत्या रुग्णांमुळे अचानक रुग्णालयांमध्ये गर्दीही वाढत आहे. सर्वांनाच या आजारापासून विशेष खबरदारी घेण्याचा आणि फ्लूपासून प्रतिबंधात्मक उपाय करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
डॉक्टरांचे म्हणणे आहे की, H3N2 विषाणू हा इन्फ्लुएंझा-ए विषाणूचा एक प्रकार आहे, त्यामुळेच गेल्या एका महिन्यात रुग्णालयांमध्ये जास्त गर्दी दिसून येत आहे. डिसेंबर ते मार्चपर्यंतचा डेटा इन्फ्लूएंझा A H3N2च्या प्रकरणांमध्ये सतत वाढ दर्शवतो. श्वासोच्छवासाच्या संसर्गासोबतच बहुतेकांना डोकेदुखी-शरीर दुखणे, सर्दी-खोकला, तीव्र तापाचा त्रास होत आहे.
रुग्णालयांमध्ये दाखल होण्याची गरज
इन्फ्लूएंझा हा फारसा गंभीर नसला तरी अहवालानुसार H3N2 विषाणूची लागण झालेल्या अनेकांना रुग्णालयात दाखल करावे लागते. या रुग्णांपैकी 90 टक्क्यांहून अधिक लोकांना ताप-कफ जास्त आहे, 27 टक्के लोकांना श्वास घेण्यास त्रास होत आहे, 16 टक्के लोकांना न्यूमोनिया आणि 6 टक्के लोकांना झटके येण्याची समस्या दिसून आली आहे. गंभीर आजारामुळे आयसीयूमध्ये दाखल व्हावे लागलेले सुमारे 7 टक्के लोक आहेत.
अँटिबायोटिक्सच्या अंधाधुंद वापरावर IMAकडून चिंता व्यक्त
इन्फ्लूएंझासारख्या आजारात रुग्ण एवढे गंभीर का?
आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, H3N2 विषाणू इतर इन्फ्लूएंझा विषाणूंपेक्षा जास्त संसर्गजन्य आणि गंभीर लक्षणे निर्माण करणारा म्हणून ओळखला जातो. जरी हा नवीन प्रकार नसला तरी त्याचे रुग्ण यापूर्वीही पाहिले गेले आहेत. सामान्य इन्फ्लूएंझा संसर्गाच्या तुलनेत, तो अधिक गंभीर आजार विकसित करू शकतो, ज्यामध्ये वेळेवर उपचार प्राप्त करून रोगाची तीव्रता कमी केली जाऊ शकते.
या संसर्गाची लक्षणे नेहमी थंडी वाजून येणे, खूप ताप येणे आणि नंतर सतत खोकला, म्हणून श्वसनाच्या इतर समस्या उद्भवतात.
कुणाला जास्त धोका?
डॉक्टर म्हणतात की, बहुतेक संक्रमितांना 102-103 अंशांपर्यंत ताप असू शकतो. शरीराच्या दुखण्यामुळे आणि श्वसनाच्या इतर समस्यांमुळे इतर अनेक अडचणीदेखील जाणवू शकतात. बहुतेक रुग्ण अँटीव्हायरल औषधांनी बरे होतात, परंतु ज्यांची प्रतिकारशक्ती कमकुवत असते त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागते.
हा इन्फ्लूएंझा-ए सामान्यतः सेल्फ लिमिटिंग असतो, म्हणजेच तो काही दिवसात आपोआपच बरा होतो आणि रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता नसते, परंतु डॉक्टरांनी इशारा दिला आहे की, प्रदूषणाची वाढलेली पातळी आणि तापमानातील चढ-उतार यामुळे रोग गंभीर स्वरूप धारण करण्याचा धोका आहे.
संसर्ग टाळण्यासाठी काय करावे?
डॉक्टर म्हणतात, काही साध्या गोष्टी लक्षात ठेवल्यास संसर्ग रोखणे आणि त्याचा प्रसार कमी करणे शक्य आहे. संसर्गाची लक्षणे असलेल्या लोकांशी जवळचा संपर्क टाळा. जेव्हा तुम्ही आजारी असाल तेव्हा घरी राहा आणि विश्रांती घ्या. शिंकताना आणि खोकताना तोंड आणि नाक झाका. हातांच्या स्वच्छतेची काळजी घ्या. डोळे, नाक किंवा तोंडाला वारंवार स्पर्श करणे टाळा. शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपाय करत राहा.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.