आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशात आणि जगातील प्रादेशिक भाषांमुळे इंग्रजीचा प्रभाव कमी हाेत आहे. ९० च्या दशकात, इंटरनेटवरील ८०% सामग्री इंग्रजीत होती, जी आता ५३% वर आली आहे. त्याच वेळी, प्रादेशिक भाषांचा हिस्सा २०% वरून ४७% पर्यंत वाढला आहे. त्यामुळे ७ वर्षांत अनुवादकांची संख्याही दुप्पट झाली आहे. फोर्ब्जच्या मते, २०२५ पर्यंत, जगातील भाषांतर उद्योग ७३.६ अब्ज डाॅलर (६ लाख कोटी रु. ) पर्यंत पोहोचू शकतो, जो सध्या ५१.६ अब्ज डाॅलर (४.२७ लाख कोटी रु.) आहे. देशात त्याचा हिस्सा सुमारे ४,१३९ कोटी रुपये आहे. आहे. २०१६ मध्ये ओटीटी प्लॅटफॉर्म सुरू झाल्यापासून, भाषांतर आणि सब-टायटल्समुळे या उद्योगात तेजी आली आहे. न्यू मॉर्निंग कन्सल्ट डेटानुसार, ८३% भारतीय भाषांतरीत (डब) किंवा सबटायटल्ससह (उपशीर्षक) परदेशी चित्रपट पाहण्यास प्राधान्य देतात.
मनोरंजन; भाषांतर पाहण्यात रशिया अव्वल
देश भाषांतरित उपशीर्षक मूळ भाषा
रशिया ८६% ७% ८%
जर्मनी ७६% १२% १२%
इटली ७३% १८% ९%
स्पेन ६७% २६% ७%
फ्रान्स ६१% २२% १७%
ब्राझील ६०% ३१% ९%
जपान ४६% ४९% ५%
भारत ४१% ४२% १७%
{८६% रशियन लोक भाषांतरित सामग्री पाहतात, जी जगात सर्वाधिक आहे. ७% उपशीर्षकांसह परदेशी चित्रपट पाहण्यास प्राधान्य देतात आणि ८% फक्त मूळ भाषेत.
{देशात ४१% लोकांना डब, ४२% ना उपशीर्षक आवृत्ती पसंत. {देशात फक्त १ % लोग इंग्रजी चित्रपट पाहतात. (सीएसडीएस सर्व्हे) {भारतात ५४% लोकांना हिंदी, ४५% लोकांना प्रादेशिक भाषा पसंत.
मातृभाषा : हिंदी ५३ काेटींची प्रथम भाषा, इंग्रजी फक्त २.६ लाखांचीच!
{हिंदी ही देशातील ५७% (६९.१५ कोटी) लोकांची पहिली, दुसरी आणि तिसरी भाषा आहे. हिंदी ही ५२.८३ कोटींची पहिली भाषा आहे.
{इंग्रजी बोलणाऱ्या देशातील एकूण ११% (१२.८५ कोटी) लोकांपैकी फक्त २.६ लाख लोकांसाठी इंग्रजी ही प्राथमिक भाषा आहे.
{गोव्यात सर्वाधिक ४१.८% लोकसंख्या इंग्रजी बोलते चंदीगड (४१.६%) दुसऱ्या क्रमांकावर आहे. छत्तीसगडमध्ये सर्वात कमी २.३% लाेक इंग्रजी बोलतात.
{उत्तर प्रदेशात ९७.४% हिंदी भाषिक. तामिळनाडूत फक्त २.१% लोक हिंदी बोलतात, जे प्रमाण देशातील सर्वात कमी.
भाषांतर: अभ्यासापासून खरेदीपर्यंत मागणी वाढली
इंटरनेट वापरकर्त्यांची ‘भाषा’
प्रादेशिक भाषेत इंटरनेट वापरणाऱ्या ५३.६ कोटी लोकांमध्ये मराठीचा वापर ९ टक्के
हिंदी: २०.१ काेटी (३८%) मराठी: ६.६ काेटी (९%) बंगाली: ४.४ काेटी (८%) तामिळ: ३.२ काेटी (६%) तेलगू: ३.१ काेटी (६%) गुजराती: २.६ काेटी (५%) कन्नड: २.५ काेटी (५%) अन्य: ११.0 काेटी (२०%) स्रोत- केपीएमजी अहवाल-२०२१
{२०२१ मध्ये देशातील १९.९ कोटी लोकांनी इंग्रजीत, ५३.६ कोटींनी प्रादेशिक भाषेत इंटरनेटचा वापर केला. (केपीएमजी अहवाल) {गुगलच्या अहवालानुसार, देशातील ९०% पेक्षा जास्त लोकांना मातृभाषेत साहित्य-सामग्री शोधायची आणि वाचायची आहे. {चित्रपटांची सुमारे ५०% कमाई भाषांतरित आवृत्त्यांमधून हाेते. नेटफ्लिक्स आणि अॅमेझाॅन प्राइम हे ओटीटी प्लॅटफॉर्म मूळ कंटंेट विविध भाषांमध्ये आणत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.