आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Information Of Chief Minister Bhagwant Mann, Anti Corruption Helpline In Punjab On The Lines Of Delhi | Marathi News

हेल्पलाइन:दिल्लीच्या धर्तीवर पंजाबमध्ये अँटी करप्शन हेल्पलाइन, मुख्यमंत्री भगवंत मान यांची माहिती

चंदीगड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुख्यमंत्री भगवंत मान म्हणाले, जो भ्रष्टाचार करेल त्याला सोडणार नाही!

पंजाबचे नवे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी भ्रष्टाचाराविरोधात मोठी घोषणा करत राज्यात भ्रष्टाचारविरोधी हेल्पलाइन सुरू करणार असल्याचे सांगितले. त्याचा क्रमांक २३ मार्च रोजी शहीद-ए-आझम भगतसिंग यांच्या पुण्यतिथीला प्रसिद्ध होणार आहे. हा माझा व्हॉट्सअॅप नंबर असेल, असे मान यांनी सांगितले. यानंतर कोणी लाच मागितली तर नकार देऊ नका, ऑडिओ किंवा व्हिडिओ रेकॉर्ड करून मला पाठवा. माझे कार्यालय याची सखोल चौकशी करेल आणि भ्रष्टाचाऱ्यांना सोडले जाणार नाही. त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. दिल्लीच्या धर्तीवर पंजाबमध्ये जनतेला भ्रष्टाचारमुक्त सरकार मिळेल. जो अधिकारी प्रामाणिक असेल, त्याला घाबरण्याची गरज नाही, पंजाबला लंडन-पॅरिस नव्हे तर खरा पंजाब बनवायचा आहे, असे त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.

बातम्या आणखी आहेत...