आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासीबीआयने गेल्या पाच वर्षांत ५६ आमदार, खासदारांवर गुन्हे दाखल केले आहेत, तर २२ या वर्षांत २२ जणांवर आराेपपत्र दाखल केले, अशी माहिती बुधवारी लाेकसभेत सरकारच्या वतीने देण्यात आली.
२०१७-२२ या काळात आंध्र प्रदेशात १० लाेकप्रतिनिधींवर गुन्हा दाखल झाला हाेता. ही आकडेवारी देशातील सर्वाधिक मानली जाते. त्यानंतर उत्तर प्रदेश, केरळमध्ये ६, पश्चिम बंगाल, अरुणाचल प्रदेशात प्रत्येकी पाच गुन्हे नाेंदवण्यात आले. तामिळनाडूतील तीन लाेकप्रतिनिधींवर गुन्हा दाखल झाला आहे. मणिपूर, दिल्ली व बिहारमध्ये प्रत्येकी तीन गुन्हे आहेत. जम्मू-काश्मीर, कर्नाटकमध्ये दाेन, तर हरियाणा, छत्तीसगड, मेघालय, उत्तराखंड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, लक्षद्वीप येथे प्रत्येकी एक गुन्हा आहे. प्रशासकीय सुधारणा, कार्मिक राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी एका प्रश्नावर लाेकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली. तपास संस्थेचे गुन्हा सिद्धतेचे प्रमाण २०१७ मध्ये ६६.९० टक्के, तर २०२१ मध्ये ६७.५६ टक्के राहिले. २०२० मध्ये असे प्रमाण ६९.८३ टक्के हाेते. गेल्या पाच वर्षांतील हे सर्वाधिक प्रमाण राहिले. विविध गुन्ह्यांत लोकप्रतिनिधींवर ही कारवाई झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.