आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशाच्या लेकी आता राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत (एनडीए) प्रवेश घेऊ शकतील. केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला ही माहिती दिली. अतिरिक्त सॉलिसिटर जनरल ऐश्वर्या भाटी यांनी न्यायाधीश किशन कौल आणि एम. एम. सुंदरेश यांच्या पीठाला सांगितले की, ‘सरकारने मंगळवारी सायंकाळी एनडीएमध्ये मुलींना प्रवेश देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मुलींना एनडीएच्या माध्यमातून स्थायी कमिशनमध्ये सहभागी केले जाईल. यासाठी पायाभूत सुविधांमध्ये बदल करण्याची गरज आहे.
यासाठी या वर्षी एनडीए प्रवेश परीक्षेत जुन्या नियमांतर्गत भरतीत सूट दिली जावी.’ सशस्त्र दलांमध्ये महिलांना समान हक्क देण्याच्या दिशेने केंद्राने घेतलेल्या निर्णयावर पीठाने आनंद व्यक्त केला. दरम्यान,याप्रकरणी सरकार या संदर्भात दोन आठवड्यांत योजना सादर करणार असून पुढील सुनावणी २२ सप्टेंबरला होणार आहे.
मागील महिन्यात सुप्रीम कोर्टाने
एनडीएमध्ये आजवर केवळ मुलांनाच प्रवेश दिला जात होता. मुलींना प्रवेश देण्याची मागणी करत कुश कालरा, संस्कृती मोरे व इतरांनी याचिका दाखल केल्या होत्या. यावर सुप्रीम कोर्टाने परवानगीबाबत अंतरिम आदेश दिला होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.