आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Initially, Putting Patients On A Ventilator Increased Mortality: WHO's Lead Researcher, Dr. Soumya Swaminathan

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुलाखत:सुरुवातीला रुग्णांना व्हेंटिलेटरवर ठेवल्याने मृत्यू वाढले : डब्ल्यूएचओच्या मुख्य संशोधक डॉ. सौम्या स्वामिनाथन

नवी दिल्ली / पवन कुमार7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोनाची लस कधीपर्यंत येऊ शकते?

कोरोनापासून बचावाचा जगभरात प्रयत्न केला जाताेय. दररोज नवनवीन उपायांवर चर्चा केली जातेय. कोरोनाची लस कधी येणार? सध्याची वापरातील आैषधी किती प्रभावी? लसीच्या आणीबाणीतील वापरास परवानगी देणे कितपत सुरक्षित ठरेल? विषाणू किती दिवस त्रस्त करेल? इत्यादी प्रश्नांबाबत ‘भास्कर’ने जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य संशोधक डॉ. सौम्या स्वामीनाथन यांच्याशी संवाद साधला. या चर्चेचे प्रमुख अंश असे-

कोरोनाची तीव्रता कमी झालीये? म्हणूनच मृत्युसंख्येत घट होतेय?
जगात सध्या तरी कोरोना विषाणूच्या तीव्रतेत बदल झाल्याचे कोठेही दिसले नाही. आताही विषाणू आधीसारखाच आहे. त्याचा हवामानाशी संबंध नाही. सुरुवातीला जास्त मृत्यू होत होते. आता कमी होत आहेत. कारण उपचाराची पद्धत लक्षात आली नव्हती. रुग्णांना व्हेंटिलेटरवर जास्त ठेवले गेले. त्यामुळे इटली, अमेरिकेतील न्यूयॉर्कसारख्या ठिकाणी मृत्युसंख्या जास्त होती. आता उपचाराची पद्धत लक्षात येत आहे. म्हणून मृत्यूमध्येही घट झाली.

कोरोनाची लस कधीपर्यंत येऊ शकते?
अनेक देशांत लसीची चाचणी दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात आहे. असे असले तरी लस येण्यास ६ ते ८ महिने लागू शकतात. कारण लसीच्या सुरक्षिततेची पडताळणी होणे गरजेचे आहे. अन्यथा धोकादायक ठरू शकतो.

लसीला तिसऱ्या टप्प्यातील चाचणीदरम्यान आणीबाणीच्या स्थितीत वापराची परवानगी जोखमीची ठरेल? आणीबाणीच्या स्थितीत चाचणीदरम्यान लसीच्या वापराची परवानगी कोणताही देश देऊ शकतो. त्यासाठी डब्ल्यूएचआेने मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. भारत सरकारच्या सीडीएससीआेला याबाबत निर्णय घ्यायचा आहे. आणीबाणीत परवानगी देण्यापूर्वी दोन टप्प्यांतील सर्व पैलूंचे परिणाम बारकाईने जाणून घेतले पाहिजेत, अन्यथा हानी होऊ शकते.

रेमडेसिविर आणि टोसिलिझुमॅब औषधांचा रुग्णांना लाभ मिळतोय?
रुग्णांना खूप चांगला फायदा झाला असे म्हणण्यासारखे परिणाम या दोन्ही आैषधांतून दिसले नाहीत. त्यामुळे त्याच्या वापरास फार प्रोत्साहन दिले जाऊ नये.

प्लाझ्मा थेरपीमुळे फायदा होतोय?
जगात कोठेही या थेरपीमुळे कोरोना रुग्णांवर प्रभावी फायदा झाल्याचे दिसले नाही. बरे झालेल्या कोरोना रुग्णांकडून प्लाझ्मा घेऊन इतर कोरोना रुग्णांना दिला जातोय. ठणठणीत झाल्यानंतर अँटिबॉडी किती दिवसांपर्यंत राहते, हे अद्याप स्पष्ट नाही. त्याचबरोबर बरे झालेल्या सर्वच रुग्णांमध्ये अँटिबॉडी तयार होतेय, हेदेखील अजून स्पष्ट नाही. रुग्णाला कोणत्या वेळी प्लाझ्मा दिला जावा, याबाबत आणखी अभ्यासाची गरज आहे. आतापर्यंतच्या अनुभवानुसार रुग्णाला सुरुवातीला प्लाझ्मा थेरपी दिल्यास लाभ मिळतो, हे दिसते.

अँटिजन टेस्ट चुकीचे परिणाम देत असूनही त्याचा वापर जोरात सुरू आहे?
अँटिजन चाचणीच्या आधी त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या किटचे परिणाम चांगले आहेत, हे निश्चित केले पाहिजे. समुदायातील विषाणूला ओळखण्यासाठी अँटिजनचा वापर केला पाहिजे. शाळा, महाविद्यालये, बाजारपेठ, कार्यालयात समुदायाची टेस्ट करायला हवी. अँटिजन टेस्टवर अवलंबून राहू नये.

कोरोनामुळे जग कुठपर्यंत त्रस्त राहील?
सध्या काही सांगणे कठीण आहे. पुढचे काही महिने काही बदल होणार नाही. ६० ते ७० टक्के लोकसंख्येला या विषाणूची बाधा होत नाही किंवा एवढ्याच प्रमाणातील लोकसंख्येचे लसीकरण होत नाही तोपर्यंत या रोगापासून मुक्तता मिळू शकत नाही.

बातम्या आणखी आहेत...