आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चाचणी:मोरमुगाओ युद्धनौकेवरून ब्रह्मोसची यशस्वी चाचणी, हल्ला करणारे क्षेपणास्त्र हवेतच केले उद्ध्वस्त, युद्धनौका 75%  स्वदेशी

मुंबई21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय नौदलात समाविष्ट करण्यात आलेल्या आयएनएस मोरमुगाओ या नवीन युद्धनौकेवरून रविवारी ब्रह्मोस क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे. क्षेपणास्त्राने लक्ष्याचा अचूक वेध घेतला. भारतीय नौदलाच्या वॉरशिप डिझाईन ब्युरोने आयएनएस मोरमुगाओची रचना केली आहे. ही शस्त्रास्त्रांनी सूसज्ज जगातील सर्वात आधुनिक क्षेपणास्त्र वाहक युद्धनौका आहे.

मोरमुगाओ स्टेल्थ गायडेड क्षेपणास्त्र विनाशक आहे. ती 75% स्वदेशी बनावटीची आहे. भारतीय नौदलाच्या मते, पी-15 ब्राव्हो प्रोजेक्टची दुसरी युद्धनौका आहे. P-15B प्रकल्पांतर्गत 4 युद्धनौका तयार केल्या जात आहेत. यापैकी विशाखापट्टणम व मोरमुगाओ भारतीय नौदलाकडे सोपवण्यात आल्या आहेत. उर्वरित 2 सुरत व इम्फाळ असून, त्या लवकरच नौदलात सामील होणार आहेत.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी गतवर्षी डिसेंबरमध्ये आयएनएस मोरमुगाओ नौदलाकडे सुपूर्द केली होती.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी गतवर्षी डिसेंबरमध्ये आयएनएस मोरमुगाओ नौदलाकडे सुपूर्द केली होती.

ब्रह्मोस वर एक नजर...

  • ब्रह्मोस हे सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र आहे. ते पाणबुडी, जहाज, विमान किंवा जमिनीवरून डागता येते.
  • ब्राह्मोस हे रशियाच्या P-800 Oceanic cruise missile तंत्रज्ञानावर आधारित आहे. ते भारतीय लष्कराच्या तिन्ही अंगांकडे म्हणजे लष्कर, नौदल व हवाई दलाला सोपवण्यात आले आहे.
  • ब्रह्मोस क्षेपणास्त्राच्या विविध आवृत्त्या आहेत. ब्रह्मोसची लँड-लाँच, जहाज-लाँच, पाणबुडी-लाँच, एअर-लाँच आवृत्त्यांची यशस्वी चाचणी झाली आहे.
  • जमिनीवरून किंवा समुद्रातून डागल्यानंतर ब्रह्मोस ताशी 290 किमीच्या वेगाने मॅक 2 वेगाने (2500 किमी / ता) आपले टार्गेट उद्ध्वस्त करू शकते.
  • ब्रह्मोस क्षेपणास्त्र पाणबुडीतून 40-50 मीटर खोलवरून डागता येते. पाणबुडीवरून मारा करणाऱ्या ब्रह्मोस क्षेपणास्त्राची 2013 मध्ये चाचणी घेण्यात आली होती.
यंदा स्वदेशी ब्रह्मोस क्षेपणास्त्र प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सादर झाले होते.
यंदा स्वदेशी ब्रह्मोस क्षेपणास्त्र प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सादर झाले होते.

गोव्याच्या नावाने मुरमुगाओ हे नाव
मुरमुगाओ युद्धनौकेचे नाव पोर्ट सिटी गोव्यावरून ठेवण्यात आले आहे. तिची कमिशनिंग 18 डिसेंबर 2022 रोजी गोवा मुक्ती दिनाच्या पूर्वसंध्येला झाली. दुसऱ्या दिवशी गोवा आपला 60 वा स्वातंत्र्यदिन साजरा करत असताना या युद्धनौकेने आपला पहिला प्रवास केला.

या विनाशिकेची लांबी 163 मीटर व रुंदी 17 मीटर आहे. त्यात 7,400 टन डिस्प्लेसमेंट आहे. INS मोरमुगाओ भारतातील आतापर्यंतची सर्वात शक्तिशाली युद्धनौका आहे. सर्वोत्कृष्ट स्टिल्थ वैशिष्ट्यांमुळे तिचे रडार क्रॉस सेक्शन (RCS) वगळण्यात आले आहे.