आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Insidestory Of Galwan | India China Galwan Violence Anthony Klan The Editor Of The Klaxon Interview | Marathi News

गलवानची इनसाइड स्टोरी:चिनी सैनिक घाबरले होते, माघार घेताना नदीत वाहून गेले; ही माहिती चिनी सोशल मीडियावर होती

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑस्ट्रेलियन वृत्तपत्र 'द क्लॅक्सन’ने 2 फेब्रुवारी रोजी आपल्या अहवालात जून 2020 च्या गलवान हिंसाचारात 42 चिनी सैनिकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त दिले होते. तर चीनने केवळ 4 सैनिकांचा मृत्यू झाल्याचा दावा केला आहे. भारतीय लष्कराशी लढताना चिनी सैनिक घाबरले होते, असे या अहवालात सांगण्यात आले आहे. मागे हटण्याच्या घाईत एकामागून एक 38 चिनी सैनिक गलवान नदीत वाहून गेले.

द क्लॅक्सनचे संपादक अँथनी क्लान यांनी NDTVला एका मुलाखतीत सांगितले - भारतीय सैनिक चिनी सैनिकांनी बफर झोनमधून त्यांचे तळ हटवले आहेत की नाही हे शोधण्यासाठी गेले होते. यादरम्यान दोन्ही सैन्याचे जवान एकमेकांशी भिडले आणि हा अपघात झाला. याचे पुरावेही आहेत. ही सर्व माहिती चीनच्या फर्स्ट-हॅन्ड सोशल मीडिया अकाउंट्सवर उपलब्ध होती, जी नंतर काढून टाकण्यात आली.

चिनी सैनिकांनी धोक्याने हल्ला केला

क्लॅक्सनने आपल्या अहवालात म्हटले आहे - 6 जून रोजी भारत आणि चीनमध्ये करार झाला होता की, दोन्ही सैन्य बफर झोनमधून माघार घेतील. भारतीय लष्कराचे कर्नल संतोष बाबू आणि त्यांचे सैनिक १५ जून रोजी चिनी अतिक्रमण हटवण्यासाठी वादग्रस्त भागात गेले होते. येथे PLAचे कर्नल क्यूई फाबाओ सुमारे 150 सैनिकांसह उपस्थित होते. माघार घेण्याऐवजी ते लढू लागले.

भारतीय सैनिकांवर हल्ला करण्यासाठी चिनी सैनिकांनी स्टील पाईप, काठ्या आणि दगडांचा वापर केला. यादरम्यान भारतीय लष्कराच्या एका जवानाने कर्नल फाबाओ यांच्या डोक्यावर हल्ला केला, त्यानंतर ते घाबरून पळून गेले. आपल्या अनेक अधिकाऱ्यांचे मृतदेह पाहून पीएलएचे सैनिक इतके घाबरले की त्यांनी वॉटरप्रूफ कपडे न घालता बर्फाळ नदीत उद्या मारल्या. नदीची पातळी अचानक वाढल्याने ते वाहून गेले.

बातम्या आणखी आहेत...