आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा'गड आला पण सिंह गेला' - छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहगड (कोंढाणा) किल्ल्याच्या विजयानिमित्त.
संडे मोटिव्हेशनल करिअर फंडामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे !
मराठेशाही अर्थात स्वराज्याची निर्मिती कशी झाली
तुम्ही व्यावसायिक असाल किंवा विद्यार्थी. आजची कथा तुम्हाला प्रेरणा दिल्याशिवाय राहणार नाही. आयुष्यात काही करताना महत्त्वाचा धडा देणारी ही कथा आहे. ज्यामध्ये तुम्हाला स्वतःला सावरायचे आहे. 'गड आला पण सिंह गेला' म्हणजे 'किल्ला जिंकला पण सिंह गेला'. हे शब्द छत्रपती शिवरायांनी कोंढाणा किल्ला जिंकल्यावर उद्गारले होते. या लढाईत त्यांचा विजय नक्कीच झाला होता. पण सिंहासारखा सेनापती तानाजी मालुसरे या युद्धात शहीद झाले होते.
सतराव्या शतकातील भारताची ही गोष्ट आहे. जेव्हा शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली मध्य भारत 'स्वराज्या'कडे वाटचाल करत होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाढत्या सामर्थ्यामुळे मुघल सम्राट औरंगजेबाने दक्षिणेतील आपल्या सुभेदाराला मराठ्यांवर हल्ला करण्याचा आदेश दिला. छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक किल्ल्यांवर आपले वर्चस्व निर्माण केले होते. पण हळूहळू मुघलांनी अनेक किल्ले आपल्या ताब्यात घेण्यास सुरूवात केली. 1665 साली पुरंदरच्या तहात शिवाजी महाराजांना कोंढाणा किल्ला देखील द्यावा लागला. या तहानंतर शिवाजी महाराज औरंगजेबाला भेटायला आग्र्याला गेले. तेव्हा त्यांना कैद करण्यात आले होते. कैदेतून सुटका करून शिवाजी महाराज महाराष्ट्रात पोहोचले आणि त्यांनी सर्व तहांना झुडकारून लावले.
यानंतर मुघलांच्या ताब्यात गेलेले मराठा किल्ले जिंकण्याची मोहीम पुन्हा त्यांनी हाती घेतली. कोंढाणा किल्लाही महत्त्वाचा होता, कारण हा किल्ला ज्याच्याकडे असेल त्याचा पुण्यावर हक्क असे मानले जात असे. मुघल-राजपूत सेनापती उदयभान राठोड यांच्या ताब्यातील सुमारे 5000 सैनिकांनी कोंढाणा किल्ल्याचे जोरदार रक्षण केले जात होते. या किल्ल्याचा ताबा घेण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला एक महत्त्वाचा सेनापती तानाजी मालुसरे यांची निवड केली होती. तानाजी मालुसरे यांनी प्राणांची आहुती देत कोंढाणा मुघलाकडून खेचून आणला होता. अशा सेनापतीच्या शौर्याची गाथा आज आपल्याला प्रेरणा देणार आहे. त्यांच्या जीवनातील पाच महत्त्वाचे पॉईंट तुम्हाला यशस्वी करतील.
कोंढाणा किल्ल्यातील विजयातून शिका पाच गुण
1) समर्पण आणि निष्ठा
काय शिकता येईल- प्राधान्यतेला महत्त्व देणे गरजेचे आहे.
2) संशोधन, विश्लेषण आणि नियोजन
काय शिकता येईल - घाईगडबडीत कोणताही निर्णय किंवा प्रकल्पकाम करू नका.
3) वेगळा पर्याय निवडला
पारंपारिक मार्गाने हल्ला करण्याऐवजी तानाजी मालुसरे यांनी किल्ल्याच्या संरक्षणातील अगदी लहान त्रुटीचा फायदा घेण्याचे ठरवले. वास्तविक किल्ल्याच्या पश्चिम टोकाला एक उंच खडक होता. जिथे गस्त फार कमी होती. असे मानले जात होते की, या खडकावर चढणे जवळजवळ अशक्य आहे. तानाजींनी याच वाटेने जाण्याचा निर्णय घेतला. काही सैनिक त्यासाठी किल्ल्याचे दरवाजे उघडून उरलेल्या मराठा सैनिकांच्या तुकडीत प्रवेश करण्याची योजना आखली. त्यासाठी मध्यरात्रीची वेळ निवडली. त्यांची योजना धोरणात्मकदृष्ट्य अचूक होती.
काय शिकता येईल - इतरांपेक्षा वेगळे करायचे, वेगळा निर्णय घ्यायचा.
4) कमी संसाधनांत चांगला परिणाम मिळवणे
जर तुम्ही ते धोरणात्मकदृष्ट्या योग्य असाल तर इतरांपेक्षा जास्तीचे योगदान ठरेल. तानाजी मालुसरे यांनी जी योजना रणनीतीनुसार योग्यरित्या अमलात आणली. योग्य रणनीतीनुसार व नियोजनानुसार काम केल्याने अवघ्या तीनशे ते पाचशे मावळ्यांनी सुमारे 5 हजार मुघल सैनिकांना हरवून कोंढाणा किल्ला जिंकू शकले.
काय शिकता येईल - एक नाविण्यपूर्ण संसाधन योजना तयार करा
5) आपत्ती हाताळण्याचे कोशल्य (आपत्ती नियंत्रण)
न सापडलेले गेट उघडण्याची संधी फार दुर्मिळ होती. त्याच मोजक्याच सैनिकांसह किल्ला जिंकणे तर आणखी कठीण होते. काहीही होऊ शकते हे तानाजींना माहित असावे, तरी देखील त्यांनी सर्व परिस्थितीला सामोरे जाण्याची तयारी दाखविली. म्हणनच त्यांच्या मृत्यूनंतर सैनिकांमध्ये चेंगराचेंगरी गोंधळ उडाला नाही. जसे अनेक प्रसंगात असे घडत असते. तानाजी मालुसरे शहीद झाल्यानंतर त्यांचे भाऊ सूर्याजी आणि शेलार मामा यांनी नेतृत्व स्वीकारले. ऑपरेशनमधला हा अत्यंत नाजूक काळ होता, तान्हाजीच्या अनुपस्थितीत, योग्य नेतृत्वाअभावी मराठे पराभूत होऊ शकले असते.
काय शिकता येईल - वाईट परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रयत्न करा
कोंढाणा किल्ला सिंहगड बनला
आज रविवारचा मोटिव्हेशनल करिअर फंडा आपल्याला शिकवतो की, सेनापतीच्या नियोजनाची गुणवत्ता, अंतिम परिणाम काय असेल आणि इतर कोणालाही दोष न देता स्वतः निर्णय घेता आले पाहीजे.
चला तर करून दाखवूया...!
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.