आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावैद्यकीय विद्यार्थ्यांच्या दृष्टीने मोठा निर्णय घेण्यात आला असून पहिली नॅशनल एक्झिट टेस्ट (नेक्स्ट) डिसेंबर २०२३ मध्ये होणार आहे. या परीक्षेसाठी प्रश्नपत्रिकेपासून इतर व्यवस्था पाहण्याची जबाबदारी राष्ट्रीय वैद्यकीय आयोग (एनएमसी)च्या निगराणीखाली दिल्ली एम्सकडे सोपवली जाऊ शकते. तथापि, याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयात सोमवारी एनएमसी आणि आरोग्य मंत्रालयांच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत नेक्स्टच्या मुद्द्यावर सविस्तर चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. नेक्स्ट शासकीय आणि खासगी दोन्ही वैद्यकीय महाविद्यालयांसाठी होणार आहे. एमबीबीएसच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेऐवजी आता ‘नेक्स्ट’ होणार आहे. यामध्ये प्राप्त गुणांच्या आधारावर वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमात (पीजी) प्रवेश मिळणार आहे. त्याचबरोबर या परीक्षेच्या निकालाच्या आधारावरच मेडिकल प्रॅक्टिस करण्याचा परवानादेखील मिळणार आहे. परदेशातून वैद्यकीय शिक्षण घेऊन आलेल्या विद्यार्थ्यांनाही देशात प्रॅक्टिस करण्यासाठी ‘नेक्स्ट’ परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानंतरच त्यांचे रजिस्ट्रेशन सुद्धा होईल. ‘नीट -पीजी’ संपुष्टात येणार आहे. दिल्ली एम्सवर ‘नेक्स्ट’ परीक्षेची जबाबदारी टाकण्यास तत्वत: मंजुरी देण्यात आली आहे. एम्स ऑब्जेक्टिव्ह प्रश्नपत्रिका तयार करण्यात येणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.