आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
 • Marathi News
 • National
 • Insurance Fraud: Businessman Arrested For Faking Own Death Drama To Claim Insurance Worth Rupees 16 Millions In Haryana

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मृत्यूच्या 3 दिवसानंतर जिवंत सापडला:दीड कोटी रुपयांच्या विम्यासाठी केला स्वतःच्या हत्येचा बनाव; दाखवण्यासाठी दीड लाखात विकत घेतला कोरोनाबाधिताचा मृतदेह

हिस्सार3 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • तज्ज्ञांनी घटनास्थळी जाऊन पहिल्याच दिवशी ओळखले ही त्या नसून केवळ सोंग

हरियाणातील हिस्सार जिल्ह्यात एका जळालेल्या कारमध्ये कथितरित्या व्यापाऱ्याचा मृतदेह सापडल्याने मंगळवारी खळबळ उडाली होती. शहरात याच जळितकांडाची चर्चा सुरू होती. पण, ज्या व्यापाऱ्याच्या मृत्यूबद्दल सांगितले जात होते तोच या तिसऱ्या दिवशी जिवंत सापडला आणि कोट्यावधींचा घोटाळा उघडकीस आला.

कुटुंबाला फोन करून सांगितले माझे जीव धोक्यात...

याबाबत सविस्तर वृत्त असे, की मंगळवारी रात्री उशीरा राम मनोहर नावाच्या एका व्यापाराचा मृतदेह एका जळालेल्या कारमध्ये सापडला. राम मनोहरने शेवटचा कॉल आपल्या कुटुंबियांना केला होता. त्यामध्ये राम मनोहरने आपल्या कुटुंबियांना विनंती केली होती, की "लवकर या माझे जीव धोक्यात आहे. दोन बाइकस्वार मला मारून टाकतील." कुटुंबियांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिस घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांना जळालेल्या कारमध्ये पूर्णपणे भाजलेला मृतदेह सापडला. दुसऱ्या दिवशी सर्वत्र बातमी आली की राम मनोहर नावाच्या एका व्यापाऱ्याकडून 11 लाख रुपये लुटले आणि त्याची हत्या करण्यात आली. पण, प्रत्यक्षात कहाणी वेगळीच होती.

कॉल डीटेल्समुळे तिसऱ्या दिवशी समोर आले सत्य

ज्या राम मनोहरच्या हत्येची चर्चा हिस्सार आणि हरियाणात होती तो शुक्रवारी 1300 किमी दूर छत्तीसगडच्या बिलासपूरमध्ये जिवंत सापडला. याच ठिकाणी पोलिसांनी त्याला अटक करून हिस्सार जिल्ह्यात आणले. एका कॉल डीटेलमुळे त्याचे बिंग फुटले. राम मनोहर मृत्यूचा तपास करताना पोलिसांनी त्याचे कॉल डीटेल्स काढले. त्यामध्ये तो एका महिलेच्या संपर्कात होता असे समजले. तिच्यावरच पाळत ठेवून पोलिसांनी रामम मनोहरचा पत्ता लावला. सविस्तर तपासात समोर आले की राम मनोहरच्या डोक्यावर कर्ज होते आणि त्याने काही दिवसांपूर्वी 1 कोटी 60 लाख रुपयांचा विमा काढला होता.

दीड लाखात विकत घेतला होता कोरोनाग्रस्ताचा मृतदेह!

पोलिस महासंचालक संजय कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, या व्यापाऱ्याने विम्याची रक्कम हडपण्यासाठी आणि कर्जदारांपासून सुटका मिळवण्यासाठी हा ड्रामा केला होता. प्राथमिक तपासात त्याने आपला मृतदेह दाखवण्यासाठी कारमध्ये एका कोरोनाग्रस्ताचा मृतदेह ठेवला होता असेही समोर आले आहे. हा मृतदेह त्याने दीड लाखात खरेदी केला होता. पोलिसांनी या दाव्याची अधिकृत माहिती दिलेली नाही. आरोपीने एखाद्या व्यक्तीची हत्या करून कारमध्ये मृतदेह ठेवला का याचा देखील तपास केला जात आहे. छत्तीसगड पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे, आरोपी बिलासपूरमध्ये जमीन विकत घेण्याच्या तयारीत होता.

तज्ज्ञांनी पाहताक्षणी ओळखले होते ही हत्या नाहीच

 • कथित हत्येती माहिती मिळताच फॉरेंसिक एक्सपर्ट डॉ. अजय यांच्या नेतृत्वात एक टीम घटनास्थळी पोहोचली होती. त्यांनी पोलिसांनी त्याच क्षणी सांगितले की ही हत्या नसून एक ड्रामा असल्याचा भास होत आहे.
 • कारला हँडब्रेक वापरून थांबवले होते. असे कुणीही कार सहज पार्क करतानाच करत असते. लूट झाली असती तर कार रस्त्यात उभी असती. पण, घटनास्थळी कार रस्त्याच्या एका बाजूला उभी होती. बळजबरी थांबवल्यास सहजासहजी कुणीही हँडब्रेक लावून गाडी रस्त्याच्या एका बाजूला उभी करणार नाही.
 • ड्रायव्हरच्या बाजूची सीट मागच्या बाजूला खूप वाकलेली होती. यातून कटकारस्थान एका दुसऱ्या ठिकाणी आणि घटना एका दुसऱ्या ठिकाणी घडल्याचे दिसते. एखाद्या अवैध संबंध, विमा घोटाळा किंवा इतर काही कारणास्तव हा बनाव केला असावा असे तज्ज्ञांनी त्याच दिवशी सांगितले होते.
 • कारला बाहेरून आणि आतून दोन्ही ठिकाणी केमिकल ओतून आग लावण्यात आली होती. एकूणच परिस्थिती पाहता हा अपघात नसून एक कट रचून मुद्दाम केलेला ड्रामा असल्याचे एक्सपर्ट्सच्या निदर्शनास आले होते. येथूनच पोलिसांनी कॉल डीटेल्स काढले. घटनेच्या वेळी ती महिला सुद्धा राम मनोहरसोबत घटनास्थळी होती असे निदर्शनास आले. कसून चौकशी केली असता संपूर्ण प्रकरणाचा भांडाफोड झाला.
Open Divya Marathi in...
 • Divya Marathi App
 • BrowserBrowser