आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Intelligence Alert ISI And Terrorist Organizations Preparing For Terrorist Attack By Local Gangsters In India

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दहशत पसरविण्याचा आयएसआयचा नवा प्लॅन:भारतात लोकल गँगस्टर्सद्वारे दहशतवादी हल्ल्याच्या तयारीत आयएसआय आणि दहशतवादी संघटना, इंटेलिजेंस विभागाची माहिती

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतात दहशतवादी कारवाया करण्यासाठी पाकिस्तानची गुप्तचर संघटना आयएसआय आणि दहशतवादी संघटनांनी लोकल गँगस्टरसोबत हातमिळवणी केली आहे. दहशतवादी संघटना या गँगस्टरद्वारे भारतात कारवाया करण्याच्या तयारीत आहेत. नुकतच चंदिगड इंटेलिजेंस युनिटने सर्व गुप्तचर संघटनांना या दहशतवादी टायअप आणि त्यांच्या लोकल कनेक्शन बाबत अलर्ट केले आहे.

काही गँगस्टर्सचे नाव देण्यासोबतच गुप्तचर विभागाने म्हटले की, आयएसआय आणि दहशतवादी संघटना गँगस्टर्सच्या मदतीने भारतात हल्ले करण्याच्या विचारात आहे. काही गँगस्टर फरार आहेत, तर काही तुरुंगात आहेत. एक सिनियर गव्हर्नमेंट अधिकाऱ्याने दावा केला आहे की, आयएसआय पूर्वीपासून या गँगस्टरच्या संपर्कात असू शकते.

5 गँगस्टर्सला दिली जबाबदारी

इंटेलीजेंसच्या पंजाब यूनिटने म्हटले होते की, आयएसआय आणि इतर दहशतवादी संघटनांनी 5 गँगस्टरला काही नेत्यांना निशाना बनवण्याची जबाबदारी दिली होती. यातील दोन गँगस्टर अजूनही फरार आहेत, पोलिस त्यांचा शोध घेत आहे. तर 3 गँगस्टर पंजाबच्या विविध तुरुंगात बंद आहेत.

न्यूज एजेंसीनुसार, या गँगस्टरवर अनेक हत्या, दरोडे, अमली पदार्थ आणि इतर गंभीर गुन्हे आहेत. स्थानिक पोलिसांना या सर्व गँगस्टरच्या प्रत्येक मुव्हमेंटवर लक्ष ठेवण्यास सांगितले आहे.

हे कारण आहे

एका अधिकाऱ्याने सांगितले की, आयएसआयच्या लोकल स्लीपर सेलला जवळजवळ संपवण्यात आले आहे, त्यामुळे आयएसआय या गँगस्टर्सची मदत घेत आहेत.