आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
चीनचे आव्हान लक्षात घेता सीडीएस जनरल बी. के. रावत यांनी हिंदी महासागर सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा असल्याचे म्हटले आहे. भारतासाठी हे ‘बॅकयार्ड’ असून येथे सामरिक तळ बनवण्यासाठी स्पर्धा सुरू झाली आहे. जगात दबदबा निर्माण करण्यासाठी हिंद - प्रशांतचा समावेश करताना सीडीएस म्हणाले, सध्या विविध माेहिमांच्या समर्थनार्थ हिंदी महासागरात अतिरिक्त प्रादेशिक दलांच्या १२० पेक्षा जास्त युद्धनाैका तैनात केल्या आहेत. या भागात आपली उपस्थिती भक्कम करण्यासाठी चीन जाेरदार प्रयत्न करत आहे. माेठ्या प्रमाणावर वाद असतानाही आतापर्यंत या भागात शांतता असल्याचे सीडीएस यांनी शुक्रवारी जागतिक संवाद सुरक्षा परिषदेत आॅनलाइन मार्गदर्शन करताना सांगितले. सीडीएस रावत म्हणाले, आम्हाला अतिरिक्त प्रादेशिक शक्ती, प्रादेशिक संपर्क आणि सहकार्यात्मक संबंधांसह धोरणात्मक स्वायत्तता राखणे आवश्यक आहे. जपान, ऑस्ट्रेलिया आणि भारत (जेएआय), भारत-आसियानसारख्या विद्यमान यंत्रणांचे योग्य संतुलन राखण्यासाठी आपल्याला द्विपक्षीय, त्रिपक्षीय आणि बहुपक्षीय यंत्रणा तयार करण्याची गरज आहे. सैन्य क्षेत्रात किंवा इतर कोणत्याही प्रदेशात कोणत्याही देशाचे वर्चस्व मिळवण्याच्या दृष्टीने तंत्रज्ञान महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल. म्हणूनच संशोधन आणि विकासातील गुंतवणूक कोणत्याही उद्योगासाठी भविष्यातील कृती निश्चित करेल.
सैन्यात तंत्रज्ञान हे कोणत्याही समस्येच्या निराकरणासाठी असले पाहिजे
संरक्षण कर्मचारी प्रमुख म्हणाले, सैन्यात तंत्रज्ञान हे कोणत्याही समस्येच्या निराकरण असले पाहिजे, विनाशासाठी नाही. सुरक्षेबाबतचा आपला दृष्टिकोन एकतर्फी असू नये. यासाठी प्रयत्न करण्याचे बरेच मार्ग आहेत. भविष्यात सुरक्षा बळकट करण्यासाठी मित्र देशांसोबत प्रशिक्षण घेण्यासारख्या घडामाेडी वाढवण्याची गरज आहे.
एलएसीवरील घडामाेडी चीनच्या एकतर्फी कारवाईचा परिणाम : भारत
लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएसी) सुरू असलेल्या घडामाेडींना चीन जबाबदार असल्याचे भारताने पुन्हा एकदा म्हटले आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव म्हणाले, गेल्या काही महिन्यांत चीनने पूर्व लडाखमधील एलएसीची स्थिती एकतर्फी बदलण्याचा प्रयत्न केला होता. या कृती एलएसीच्या द्विपक्षीय करार व प्रोटोकॉलचे उल्लंघन करतात. या घडामाेडी त्यामागचेच कारण आहे. सीमेवरील घडामाेडींवर चीनने केलेल्या टिप्पणीवर बाेलताना मंत्रालयाने चीन आपण दिलेल्या शब्दानुसार कारवाई करेल अशी अशा असल्याचे म्हटले आहे.
नेपाळच्या काळी नदीमार्गे हाेणारी घुसखाेरी राेखण्यासाठी श्वानपथके पिथाैरागड | नेपाळच्या काळी नदीमार्गे हाेणारी घुसखाेरी राेखण्यासाठी सशस्त्र सीमा दलाने भारत - नेपाळ सीमेवर श्वानपथके तैनात केली आहेत. सीमा सुरक्षा दलाच्या ५५ व्या बटालियनचे अधिकारी संतोष लाल म्हणाले की, असामाजिक घटक काळी नदीतील पाण्याची पातळी कमी होण्याचा फायदा घेत भारतीय सीमेमध्ये प्रवेश करतात. याला आळा घालण्यासाठी सीमेला लागून असलेल्या गावांमधील लोकांनाही जवानांनी सतर्क केले आहे. नेपाळमधून भारतीय सीमेमध्ये काेणताही घुसखाेरीचा प्रयत्न झाल्यास त्वरित एसएसबीला कळवा असे लाेकांना सांगितले आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.