आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंशदानाचे व्याज लवकरच:पीएफ खात्यांत लवकरच येणार व्याज : ईपीएफओ

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) २०२१-२२ मधील अंशदानाचे व्याज लवकरच खात्यांमध्ये जमा करेल. सोशल मीडियावर विचारलेल्या एका प्रश्नावर मिळालेल्या ईपीएफओच्या उत्तरामुळे ७ कोटी ईपीएफओ खातेधारकांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. व्याजाचा पैसा अद्याप खात्यांमध्ये पोहोचला नसल्याने एका खातेधारकाने सोशल मीडियावर ईपीएफओला टॅग करून राग व्यक्त केला होता. त्याने ईपीएफओ, अर्थ मंत्रालय आणि पीएमओ इंडियाला टॅग करत लिहिले, ‘२०२१-२२ च्या अंशदानाचे व्याज कधीपर्यंत मिळेल.’ त्यावर ईपीएफओने उत्तर दिले, ‘प्रिय सदस्य, व्याज जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. व्याज जमा केल्यानंतर त्याचे संपूर्ण पेमेंट केले जाईल. व्याजाचे नुकसान होणार नाही.’

बातम्या आणखी आहेत...