आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • National
 • International Happiness Day, Happy + Surveyed More Than 20,000 People In India |Marathi News

दिव्‍य मराठी रिसर्च:इंटरनॅशनल हॅपिनेस-डे आज हॅपी+ने 20 हजारांहून जास्त लोकांत केला सर्व्हे,

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • आनंदी असल्याचे 55 टक्क्यांचे म्हणणे

आम्ही : ६० वर्षांवरील सर्वात जास्त आनंदी, ३६ ते ४५ चे सर्वात दु:खी
नवी दिल्ली - देशातील निम्म्याहून जास्त लोक ते आनंदी असल्याचे मानतात. ५२% लोकांनुसार, आयुष्यासाठी प्रत्येक आवश्यक वस्तू माझ्याकडे आहे. हॅपी+ कन्सल्टन्सीच्या २८ राज्यांत २०,०७३ लोकांचे मत आजमावण्यात आले. त्यातून हे निष्कर्ष निघाले आहेत. त्यानुसार, ७७% लोक जे काम करत आहेत, ते तसेच करू इच्छितात. ६४% लोकांचे ध्येय निश्चित आहे. ६७% लोक रोज उद्दिष्टपूर्तीकडे सरकत आहेत. ६० वर्षांवरील ज्येष्ठ सर्वात समाधानी व आनंदी, तर ३६ ते ४५ वयाचे सर्वाधिक दबावात असल्याचे समोर आले.

महिलांचा आनंद पुरुषांपेक्षा जास्त;१८ खालील मुलांचे आयुष्य मजेत

 • तुम्ही सर्वात चांगले आयुष्य जगत आहात का, असे विचारल्यावर १८-४५ वयाच्या बहुतांश लोकांनी संघर्ष करत असल्याचे मान्य केले. यात १८-२५ चे जास्त आहेत.
 • आयुष्यात जे करू इच्छित होता, ते करता का? याच्या उत्तरात ४६-६० वयाचे सर्वात समाधानी दिसले. मात्र, सामाजिक पाठबळात या गटातील लोक समाधानी आहेत.
 • महिला जास्त आनंदी आहेत. आनंद निर्देशांकात महिलांनी १० पैकी ६.९, पुरुषांनी ६.८ क्रमांक दिले.
 • आनंद आणि आनंद पातळीचा स्तर १८ वर्षांपेक्षा कमी वय असणाऱ्यांत सर्वाधिक, ३६-४५ मध्ये सर्वात कमी.
 • राज्य : हिमाचल-पंजाब समाधानी,यूपी-मध्य प्रदेशात जास्त त्रास
 • राज्यनिहाय स्थिती पाहिल्यास हिमाचल प्रदेश देशात सर्वात आनंदी व समाधानी आहे. पंजाब दुसऱ्या, उत्तराखंड तिसऱ्या आणि चंदीगड चौथ्या क्रमांकावर आहे. दुसरीकडे, ३६ राज्यांच्या यादीत यूपी सर्वात खाली व मध्य प्रदेश ३५ वर आहे. हॅपी+ने अनेक मापदंडावर रँकिंग केली. यामध्ये हॅपिनेस इंडेक्स, सकारात्मक-नकारात्मक भावना, सोशल सपोर्ट, आवडीच्या कामाचे स्वातंत्र्य, उदारता, भ्रष्टाचार, मायक्रो हॅपिनेस लेव्हलचा समावेश आहे. याशिवाय आरोग्य निर्देशांक, दरडोई उत्पन्न, साक्षरता दर आदींच्या आधारावर पाहणी केली.

हॅपिनेस इंडेक्स : तामिळनाडू, सोशल सपोर्ट: लडाख,

उत्तराखंड अव्वल.

रँक राज्य
1 हिमाचल
2 पंजाब
3 उत्तराखंड
4 चंदीगड
6 दिल्ली
16 हरियाणा
17 गुजरात

21 प. बंगाल 26 छत्तीसगड 27 राजस्थान 28 झारखंड 34 बिहार 35 मध्य प्रदेश 36 यूपी

देश: ८८% म्हणाले, अडचणीत लोक त्यांच्या मदतीस येतील
हॅपी+च्या सर्वेक्षणानुसार, देशाचा स्कोअर ६.८४ आहे. ८७.८ टक्क्यांना वाटते की, अडचणीत लोक त्यांना मदत करतील. ८३.१% म्हणाले, त्यांना काम निवडण्याचे स्वातंत्र्य आहे. ४३.२% म्हणाले, सरकार व व्यवसायात भ्रष्टाचार आहे. ७०.५% लोकांच्या आयुष्यात आनंद, विनोद व आनंदाची अनुभूती आहे. ३२.९% असे आहेत, कधीतरी वा रोज चिंता, दु:ख व रागाशी सामना होतो. आवडीचे काम निवडण्याचे स्वातंत्र्य पुरुषांना जास्त आहे.
वर्ल्ड हॅपिनेस रिपोर्ट-२०२२ : भारत १३६ व्या क्रमांकावर आहे. २०२१ मध्ये १३९ वर होता. फिनलंड सलग पाचव्यांदा सर्वात आनंदी
४२% लोकांना तणाव जाणवतो, कोरोना हे त्याचे सर्वात मोठे कारण
७०% भारतीयांना कधी कधी, नेहमी वा रोज टेन्शन मिळते. ४२% बऱ्याचदा तणावात राहतात. याचे ५ मोठी कारणे- कोरोनावरून अनिश्चितता, आरोग्य, आर्थिक स्थिती, कुटुंब-मित्र, कार्यस्थळाचा दबाव.
२% लोक असे आहेत, जे कधी तणाव घेत नाहीत. ९% रोज तणाव सोसतात. १३% कधी कधी तणावात असतात.
सरकारी नोकरी करणारे खासगी जॉब करणाऱ्यांच्या तुलनेत जास्त समाधानी. बेरोजगार सर्वात दु:खी.
सरकारी नोकरी करणाऱ्यांना सोशल सपोर्ट सर्वात जास्त मिळतो. बेराेजगारांना सर्वात कमी मिळतो.

बातम्या आणखी आहेत...