आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआंतरराष्ट्रीय स्तरावर टेक कंपन्यांमध्ये कर्मचारी कपात आणि मंदींच्या सावटाची चाहूल लागलेली असताना देशातील आयआयटीमधून सुखद बातमी आहेे. आयआयटी मुंबईत सुरू असलेल्या प्लेसमेंट सीझनमध्ये विद्यार्थ्यंावर नोकऱ्यांचा वर्षाव होत आहे. या वेळी विद्यार्थ्यांना सुरुवातीच्या १० दिवसांत देश-विदेशांतून १५०० ऑफर मिळाल्या आहेत. यापैकी १२२४ ऑफर त्यांनी स्वीकारल्या आहेेत. ७१ ऑफर आंतरराष्ट्रीय असून, त्या गेल्या हंगामाच्या तुलनेत ८% अधिक आहेत. आयआयटी बॉम्बेच्या प्लेसमेंट कमिटीनुसार, सर्वात मोठी ऑफर वार्षिक चार कोटी रुपयांची आहे. २५ पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना वार्षिक एक कोटी रुपयांपेक्षा जास्त पॅकेज मिळाले आहे. यावेळी ४०० कंपन्यांनी प्लेसमेंटसाठी नोंदणी केली होती. यात टीएसएमसी, मॅकेंझी, अमेरिकन एक्स्प्रेस, बोस्टन कन्सल्टंसी समूह, होंडा जपान, मॉर्गन स्टॅनली आणि स्प्रिंकलरचा समावेश आहेे. यावेळी अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी पहिल्या फेरीतच टॉपच्या विद्यार्त्यांना चांगल्या ऑफर दिल्यामुळे रिलायंस, टाटा आणि अदाणी यासारख्या कंपन्यांना चांगल्या विद्यार्थ्यांची तूर्त प्रतीक्षा करावी लागत आहे.
पूर्व आशियायी कंपन्या अधिक
आयआयटी बॉम्बेनुसार, यावेळी प्लेसमेंटची आणखी एक विशेष बाब म्हणजे बहुतांश कंपन्या पूर्व आशियायी देशांतील आहेत. यात जपान, तैवान, दक्षिण कोरिया आणि सिंगापूरचा समावेश आहे. गेल्या हंगामात बहुतांश कंपन्या अमेरिका, नेदरलँड्स, यूएई आदी देशांतील होत्या.
आयआयटी म्हणजे कोटीची नोकरी पक्की
{यंदा आंंतरराष्ट्रीय कंपन्यांनी आयआयटीला एक कोटी रुपयांपेक्षा जास्तीच्या १३३ ऑफर दिल्या.{दिल्ली, बॉम्बे, कानपूरच्या ३ विद्यार्थ्यांना वार्षिक ४ कोटींच्या पॅकेजची ऑफर. आतापर्यंत सर्वाधिक.
{आयआयटी खरगपूरच्या विद्यार्थ्यांना एक कोेट ते २.६५ कोटींपर्यंतच्या नोकऱ्यांची ऑफर केली गेली.
{दिल्लीच्या ५० पेक्षा अधिक, कानपूरचे ३३, मद्रासचे २५, गुवाहाटीचे ८, वाराणसचे ४, रूरकीच्या २ विद्यार्थ्यांना १ कोटीपेक्षा जास्तीचे पॅकेज.
एक्स्पर्ट
डॉ. अनिष्या ओ मदान, हेड, करिअर सर्व्हिसेस, IIT दिल्ली
ट्रेंड वाढला कारण एमआयटीत दबदबा; फेसबुक-गुगलही फॅन
जगातील सर्वोत्कृष्ट संस्था एमआयटीमध्ये चीननंतर दुसऱ्या क्रमांकावर भारतीय विद्यार्थी आहेत. तेथे जवळपास ९% विद्यार्थी भारतीय आहेत. यातील बहुतांश विद्यार्थी आयआयटी उत्तीर्ण होऊन बाहेर पडले आहेत. यामुळेच विदेशात भारतीय विद्यार्थ्यांना प्रतिष्ठा आहे. दुसरीकडे, फेसबुक आणि गुगलसारख्या कंपन्यांत भारतीय विद्यार्थ्यांची संख्या बऱ्यापैकी आहे. त्यांचा परफॉर्मन्स पाहून विदेशी कंपन्या इच्छुक आहेत. जागतिक स्तरावर देशातील काही आयआयटींनी सुधारणा केल्या आहेत.त्यामुळे चांगले पॅकेज आणि प्लेसमेंटचा ट्रेंड वाढला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.