आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धार्मिक ध्वजावर मांस चिकटवल्याने तणाव:जमशेदपूरमध्ये हिंसाचारानंतर इंटरनेट बंद; जमावबंदी आदेश

जमशेदपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

झारखंडच्या जमशेदपूरमध्ये धार्मिक ध्वजाच्या अवमानानंतर रविवारी दोन गटांमध्ये वाद झाला. शास्त्रीनगर परिसरात घडलेल्या या घटनेनंतर दोन्ही गट समोरासमोर आले. यात जाळपोळ व दगडफेक झाली. दोन दुकाने आणि पिठाची गिरणी जळून खाक झाली. शनिवारी रात्री रामनवमी उत्सवातील ध्वजाला मांसाचा तुकडा चिकटलेला आढळल्यानंतर तणाव वाढला होता. यामुळे इंटरनेट बंद केले असून जमावबंदी आदेश बजावले.सोमवारी सुरक्षा दलांनी ध्वज संचलन केले. धडक कृती दलाच्या एका तुकडीसह अतिरिक्त फौज तैनात केली आहे.

मुंबई हिंसचारात २० अटकेत: मुंबईच्या मालाडमधील मालवणीत ३० मार्चला झालेल्या हिंसाचार प्रकरणी २० जणांना अटक केली आहे. पोलिसांनी २०० हून अधिक जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

छत्तीसगड : हिंसाचाराच्या विरोधात विहिंपचा बंद छत्तीसगडमधील बेमेटारा येथे झालेल्या जातीय हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर विश्व हिंदू परिषदेने सोमवारी राज्यात बंदची हाक दिली आहे. बेमेटाराच्या बिरनपूर गावात शनिवारी झालेल्या हिंसाचारात एकाचा मृत्यू झाला तर तीन पोलीस जखमी झाले.