आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारत सलग पाचव्या वर्षी इंटरनेट बंद करण्यात जगात आघाडीवर आहे. 2022 मध्ये जगात एकूण 187 वेळा इंटरनेटवर बंदी घालण्यात आली होती. त्यापैकी 84 वेळा भारतात बंदी घालण्यात आली होती. यामध्येही जम्मू-काश्मीरमध्ये सर्वाधिक इंटरनेट बंदी लागू करण्यात आली आहे. येथे एका वर्षात 49 वेळा इंटरनेट बंद करण्यात आले. न्यूयॉर्क-आधारित डिजिटल अधिकार वकिली गट अक्सेस नाऊने मंगळवारी हा अहवाल प्रसिद्ध केला.
जानेवारी-फेब्रुवारीमध्ये सलग तीन दिवस इंटरनेट बंद
अहवालात म्हटले आहे की, जानेवारी आणि फेब्रुवारी 2022 मध्ये काश्मीरमधील राजकीय अस्थिरता आणि हिंसाचारामुळे तीन दिवस सतत इंटरनेट बंद होते. यासाठी एकापाठोपाठ एक 16 आदेश काढण्यात आले. केंद्र सरकारने ऑगस्ट 2019 मध्ये कलम 370 हटवल्यानंतर आणि जम्मू आणि काश्मीरच्या दोन केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती केल्यापासून, सरकार सुरक्षेच्या कारणास्तव अनेक भागात सतत कम्युनिकेशन बंदी घालत आहे.
दुसऱ्या क्रमांकावर युक्रेन, तिसऱ्या क्रमांकावर इराण
या यादीत युक्रेन दुसऱ्या क्रमांकावर होते. 24 फेब्रुवारी 2022 रोजी रशियाने युद्ध पुकारल्यानंतर रशियन सैन्याने युक्रेनमधील इंटरनेट कनेक्शन सुमारे 22 वेळा कापले. लष्कराने सायबर हल्ले केले आणि दूरसंचार पायाभूत सुविधा नष्ट करण्याचा प्रयत्न केला.
इराण या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. 2022 मध्ये प्रशासनाने 18 वेळा इंटरनेट बंद केले. येथे 16 सप्टेंबर रोजी पोलिस कोठडीत 22 वर्षीय कुर्दिश-इराणी महिला म्हसा अमिनीचा मृत्यू झाल्यानंतर देशभरात सरकारविरोधात निदर्शने झाली. त्यांना रोखण्यासाठी सरकारने इंटरनेटवर बंदी घातली होती.
2017 नंतर प्रथमच भारतात 100 पेक्षा कमी वेळा इंटरनेटवर बंदी घालण्यात आली
भारतात गेल्या सात वर्षांत एकूण 654 वेळा इंटरनेटवर बंदी घालण्यात आली. यादरम्यान जगभरात एकूण 1,120 इंटरनेट बंद करण्यात आले. भारतात 2017 मध्ये 69 वेळा इंटरनेटवर बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर देशात दरवर्षी 100 हून अधिक वेळा इंटरनेटवर बंदी घालण्यात आली. 2017 नंतर प्रथमच 2022 मध्ये हा आकडा 100 पेक्षा कमी आहे.
2 वर्षांत 1 जीबी डेटाची किंमत दुप्पट
तुम्हाला माहिती आहे का? की, स्वस्त इंटरनेटच्या बाबतीत भारत जगातील सर्व देशांत 5 व्या क्रमांकावर आहे. पण तुम्हाला हे माहिती आहे का की, असे असूनही गेल्या दोन वर्षांत भारतात मोबाईल इंटरनेट युझर्सची संख्या वाढली नाही. देशात गेल्या 2 वर्षांत आयटी सेक्टरमध्ये आलेली बूम आणि टेक स्टार्ट-अप्सच्या पुराने असे नक्कीच वाटत आहे की संपूर्ण देश मोबाईलवरच सुरू आहे. पण याच्या तुलनेत जर आपण मोबाईल इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या बघितली तर वेगळे चित्र पाहायला मिळते. येथे वाचा संपुर्ण बातमी.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.