आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराचित्रपटांवरील बहिष्कारापासून रामचरितमानसची चौपाई आणि जोशीमठापासून बागेश्वर धामपर्यंतच्या मुद्द्यांवर चर्चा सुरू आहे. या मुद्द्यांबाबत द्वारका-शारदा पीठाधीश्वर जगदगुरू शंकराचार्य स्वामी सदानंद सरस्वतीजी महाराज यंाच्याशी झालेल्या चर्चेतील प्रमुख मुद्दे...
{आता साधू-संत ठरवणार का देशात कोणता चित्रपट चालेल ?
सेन्साॅर बोर्डसारख्या सध्याच्या प्रणालीचा एवढा उपयोग होत असेल तर असे चित्रपट तयार होतील? भगवा आणि धर्माचा असा अवमान झाला असता? आम्हालाही म्हणणे मांडण्याचा हक्क आहे. मर्यादा ओलांडल्यावर आम्ही विरोध करू.
{मात्र, तुमच्या गुरूंनी साईबाबांना विरोध केला. मात्र, बागेश्वरधामचे धीरेंद्र शास्त्री चमत्काराबाबत बोलल्यावर तुम्ही समर्थन करू लागला?
हाे, मी बागेश्वरधामचे समर्थन करतो. तेथे पैसे देऊन लोक येत नाहीत. लोक स्वत:हून तेथे जातात. मंत्र-तंत्र प्रयोगांना मनाई नाही.
{बिहार आणि उत्तर प्रदेशच्या दोन नेत्यांनी रामचरितमानसची चौपाई ‘ढोल गंवार शूद्र पशु नारी, हे सब ताडन के अधिकारी’ ला शूद्रांच्या विरोधात ठरवले आहे. अचानक हे सर्व कुठून आले?
धर्माच्या आडून केवळ राजकारण होत आहे. जे रामचरितमानसला विरोध करत आहेत तेही हिंदू आहेत. मत आणि राजकारणाने त्यांना धर्मापासून दूर लोटले आहे.
{राम मंदिर ट्रस्टमध्ये शंकराचार्यांचा समावेश का नाही?
सुरुवातीस आम्ही आंदोलनाच्या काळात ट्रस्टमध्ये होतो. आमच्या शंकराचार्यांचा युक्तिवादही न्यायालयाने एेकला होता. त्याचा उल्लेखही केला होता. आता नव्या ट्रस्टमध्ये आम्ही नाही. मात्र, मंदिर व्हावे ही आमची इच्छा आहे. काम झाले पाहिजे. भले आम्ही असू की नसू. हिंदूंची अनेक वर्षांपासूनची भावना साकारली जात आहे. याचाच खरा आनंद आहे. आता शंकराचार्य का नाहीत हे सरकारला विचारा.
{जोशीमठामध्ये पडझड होत आहे. बद्रीनाथमध्येही अशी स्थिती. कारण काय?
नैसर्गिक, राजकीय अनेक कारणे कारणीभूत आहेत. डोंगर पोखरण्यासारख्या योजना तयार केल्या. प्रत्येक सरकारने हे केले. विरोधही झाला. तेथील डोंगर मोठ्या दगडाचे नाहीत. यामुळे नुकसान होणारच होते. पैशासाठी डोंगर पोखरले. परिणामी निसर्गाने उत्तर दिले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.