आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांची मुलाखत:उद्योगपतींना चीनमधून गाशा गुंडाळून मप्रत कारखाना उभारण्याची इच्छा : शिवराज

भोपाळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मध्य प्रदेश या महिन्यात दोन मोठ्या सोहळ्यांचे यजमानपद भूषवणार आहे. प्रवासी भारतीय संमेलन व जागतिक गुंतवणूक परिषद. पंतप्रधान आणि राष्ट्रपती या परिषदांना उपस्थित राहणार आहेत. ६६ देश यात सहभागी होत आहेत. दोन राष्ट्राध्यक्षांचीही उपस्थिती असेल. यावर मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याशी उपमिता वाजपेयी यांचा संवाद

प्रथमच प्रवासी संमेलन अन् गुंतवणूक परिषदेत ‘अद्वैत लोक’चे प्रदर्शन, जगाला घडवणार मध्य प्रदेशची संस्कृती अन् स्वच्छतेचे दर्शन

ग्लोबल समिटमध्ये आपली सर्वात मोठी आशा काय?
विक्रेते-ग्राहक बैठक होईल. आपल्या निर्यातकांची वन-टू- वन मीटिंग होईल. मध्य प्रदेशात निर्मित उत्पादने जगभरात जातील. संपूर्ण जगात मध्य प्रदेशचे ब्रँडिंग होईल. पर्यटन, वन्यजीव, वारसा असो की धार्मिक पर्यटन. उत्पादनात आपण अनेक विक्रम मोडले. ड्यूरम व्हीट, बासमती तांदूळ प्रदर्शित करू. आपले खानपान व स्वच्छता जगाससमोर मांडू.

यंदा प्री-बुकिंग कसे आहे?
नोंदण्या मोफत नव्हे १०० डॉलर देऊन झाल्या. दरवेळी २००० व्हायच्या, यंदा ३८०० झाल्या. त्या दुप्पट झाल्या.

चायना प्लस वन स्ट्रॅटेजीकडून मध्य प्रदेशलाही आशा आहेत का?
अनेक उद्योगपती चीनमधून चंबुगबाळे आवरून भारतात येऊ इच्छिताहेत. त्यांना मप्रत कारखाना सुरू करायचा आहे. यात सेमीकंडक्टर व फार्मातील काही मोठे समूह आहेत.

तुम्ही ग्लोबल इन्व्हेस्टर समिटसाठी कोणत्या मोठ्या औद्योगिक समूहांना स्वत: फोन करून आमंत्रण दिले आहे? ७० मोठे उद्योजक असून त्यांची उलाढाल ५००० कोटींवर आहे. १० हजार उलाढालीच्या कंपन्याही आहेत. टाटाचे चंद्रशेखरन, अजय पिरामल, कुमार मंगलम बिर्ला, सुनील भारती मित्तल यांच्याशी मी स्वत: बाेलून त्यांना निमंत्रित केले आहे.

हा केवळ सोहळाच ठरू नये, कंपन्यांशी पूर्णपणे करार होतील, यासाठी तुम्ही काय विशेष करणार आहात?
भाषणाने नव्हे ते वन-टू-वन भेटल्याने टायअप हाेत असते. यामुळे मी तेथे १८ तास बसून कंपन्यांशी वन-टू-वन मीटिंग करणार आहे. ३१४ कंपन्यांना माझ्याशी वन-टू-वन मीटिंग करायची आहे. करारांचा सक्सेस रेट २५% आहे. आज चर्चा केली आणि उद्या प्रकल्प सुरू होईल, असे शक्य नसते.

माफिया-अत्याचार करणाऱ्यांविरुद्ध अभियान राबवले, जमिनी सोडवल्या, त्या गुंतवणुकीसाठी देणार?
ज्या शहरांत आहेत, तिथे मल्टी बनवणार. ज्या शहरापासून दूर आहेत त्या गुंवतणुकीसाठी देता येतील. शहरापासून दूर लोक राहणार नाहीत. त्यामुळे व्यवसायासाठी त्यांचा वापर करावा.

असे काय आहे जे प्रथमच या परिषदेत होत आहे?
प्रदर्शनात अद्वैत लोक बनवले जात आहे. यात वेदांत वारसा दाखवला जाईल. पहिल्यांदा जगभरातून आलेले लोक होमस्टेमध्ये इंदूरच्या कुटुंबीयांसोबत राहतील. १०० लोकांनी यासाठी नोंदणी केली आहे. कार्यक्रमाला येणाऱ्या प्रत्येक प्रतिनिधीच्या नावे एक झाडही लावण्यात येईल. प्रदर्शनात परदेशी स्टॉलही लावले जातील. इतक्या मोठ्या मध्य प्रदेशात जागतिक गुंतवणूकदार परिषद झालेली नाही.

कोणत्या क्षेत्रामध्ये सर्वाधिक अपेक्षा आहे?
टेक्स्टाइल आणि रेडिमेड गारमेंटमध्ये आम्हाला सर्वाधिक रस आहे. कारण त्यात सर्वात जास्त रोजगार आहेत. त्यातही विशेष म्हणजे यातून मिळणारे रोजगार मुलींना मिळतात. याशिवाय फार्मा, टुरिझम, आयटी, ऑटोमोबाइलवरही फोकस करत आहोत.

अनेकदा गुंतवणूकदार परिषदेत बिझनेस ग्रुप जमीन घेतात, पण गुंतवणूक करत नाही, याचे काय करणार?
आम्ही कालमर्यादा निश्चित केली आहे. त्यादरम्यान कारखाना सुरू केला नाही तर वाटप रद्द केले जाईल आणि याचे आम्ही काटेकोरपणे पालन करू.

बातम्या आणखी आहेत...