आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Introverted Person Performs Well In Science, Technology, Mathematics; The Focus Is On Creativity

यशाचा मंत्र:अंतर्मुख व्यक्ती विज्ञान, तंत्रज्ञान, गणितात करते चांगली कामगिरी; सर्जनशीलतेवर असते लक्ष

मंत्र8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एक बर्हिमुख व्यक्ती करिअरमध्ये यशस्वी होते हा मोठा गैरसमज आहे. द इंट्रोवर्टेड लीडर : बिल्डिंग ऑन युवर क्वॉइट स्ट्रेंथच्या लेखिका डॉ. जेनिफर कन्नवीलर यांच्यानुसार, नोकऱ्यांमध्ये उत्साही, मनमिळावू आणि धोका पत्करणाऱ्या लोकांना प्राधान्य दिले जाते, असे म्हटले जाते. कमी बोलणारे लोक (इंट्रोवर्ट्स) यात फिट बसत नाहीत. हा समज चुकीचा आहे. एक गोष्ट अंतर्मुख लोकांना वेगळी बनवते ती म्हणजे, ते जास्त आत्मनिरीक्षण करतात आणि आपल्या एकांतातून ते शक्ती प्राप्त करतात. उदाहरणासाठी गुगलचे संस्थापक लॅरी पेज, याहूच्या माजी सीईओ मारिसा मेअर, नवाजुद्दीन सिद्दिकी अंतर्मुख असूनही यशस्वी झाले. तज्ञांच्या मते, अंतर्मुख मोकळे नसले तरी चांगले संशोधक, बोलण्याआधी विचार करणे, स्थितीचे चांगल्या पद्धतीने मूल्यांकन करणे, लोकांचे ऐकून घेणे अशी कौशल्य त्यांना प्रगती करण्यात मदत करतात. आयवॉज कम्प्यूटर गीक टू कल्ट आयकनमध्ये स्टीव्ह वोज्नियाक यांनी लिहिले, जेवढ्या संशोधक आणि अभियंत्यांना भेटलो, ते लाजाळू व आपल्या जगात रमणारे होते. ते चांगले कलाकार होते आणि एकांतात काम करून चांगले परिणाम दिले होते. ही वस्तुस्थिती अंतर्मुख आणि सर्जनशीलता यांच्यात एक मजबूत नाते दाखवते.

नोकरीत मल्टिटास्किंग प्रोजेक्ट्स नव्हे, फोकस्ड टास्क निवडा

तंत्रज्ञानाच्या विस्तारामुळे संधी वाढल्या
अंतर्मुख व्यक्तीला एकांतात काम करण्याची संधी मिळाली तर ते जास्त यशस्वी होतात. आता तंत्रज्ञानाच्या विस्तारामुळे अशा संधी वाढल्या जेथे दुसऱ्यांचा हस्तक्षेप कमी असतो. ऑनलाइन नोकरीत अंतर्मुखची चांगली कामगिरी दिसली आहे. अशात तुमचा अंतर्मुख स्वभाव तुमच्यासाठी आव्हान ठरत नाही तर जेथे तुम्हाला तुमच्या स्वभावाच्या गुणांचा चांगला वापर करता येईल अशा ठिकाणी पोहाेचणे आव्हानात्मक असते.

क्वॉइट पॉवरच्या लेखिका सुझैन कॅन यांच्यानुसार अंतर्मुख व्यक्ती कधीच आकर्षणाचा केंद्र होण्याचा प्रयत्न करत नाहीत. त्या ऐवजी ते आपल्या आयुष्यात काही विशेष ध्येयांवर लक्ष केंद्रित करतात. आपल्या कल्पना पूर्ण करण्यासाठी ते कौशल्य प्राप्त करतात आणि त्यात यशस्वी होतात. तज्ञांचे म्हणणे आहे की, तुम्ही जर कमी बोलत असाल तर तुम्हाला अशा संधी शोधायला हव्यात, जेथे एकावेळी एकच काम करायचे असेल. असे काम जे मल्टिटास्किंग असेल किंवा जेथे घाई घाईत आपले लक्ष एकापेक्षा जास्त कामांवर द्यायचे असेल ते अंतर्मुखी स्वभावाचे लोक चांगल्या पद्धतीने करू शकत नाहीत.

या नोकऱ्यांमध्ये इंट्रोव्हर्ट अधिक यशस्वी होतात
तज्ज्ञांच्या मते, विज्ञा आणि संशोधनाच्या क्षेत्रात त्यांना चांगल्या संधी मिळतात. याव्यतिरिक्त लँडस्कॅप डिझायनर, वेटरनरी डॉक्टर, लायब्रेरियन, थॅरेपिस्ट, अकाउंटिंग मॅनेजर, ऑडिटर, ग्रॉफिक डिझायनर, लेखक, टेक्निकल रायटर, कंटेंट मॅनेजर, सिने दिग्दर्शक, आर्टिस्ट, फोटोग्राफर, अप्लाइड सायंटिस्ट, आयटी मॅनेजर सारखेपददेखील अंतर्मुख व्यावसायिकांसाठी योग्य आहेत. इतर नोकऱ्यांच्या तुलनेत इथला पगारही चांगला असतो.

डॉ. अनामिका चौहान लाइफ कोच व फाउंडर मॅग्निफिसंट यू

बातम्या आणखी आहेत...