आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

1857 कोटींचा कर्ज घोटाळा:उद्योगपती वेणुगोपाल धूत यांची ईडीकडून चौकशी, घोटाळ्यामुळे बँकेला 1730 कोटींचा फटका

नवी दिल्ली24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयसीआयसीआय बँक-व्हिडिओकाॅन १८७५ कोटींच्या कर्ज घोटाळ्याप्रकरणी उद्योगपती वेणुगोपाल धूत यांची बुधवारी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) चौकशी केली. या घोटाळ्यामुळे बँकेला १७३० कोटींचा फटका बसला होता. एपीजे अब्दुल कलाम रोडवरील ईडीच्या मुख्यालयात धूत सकाळी दाखल झाले. त्यानंतर अधिकाऱ्यांनी कर्ज घोटाळ्याशी संबंधित प्रश्नांची सरबत्ती केली.

यापूर्वी मार्च २०१९ मध्ये या कर्ज घोटाळ्याशी संबंधित व धूत यांचे निकटवर्तीय नू पॉवर रिन्युएबल्स कंपनीचे संचालक महेश पुंगलिया यांचीही ईडीने चौकशी केली होती. त्याचप्रमाणे फेब्रुवारी २०१९ मध्ये ईडी पथकाने धूत यांच्यासह आयसीआयसीआय बँकेच्या तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ चंदा कोचर, त्यांचे पती दीपक कोचर यांचे निवासस्थान, कार्यालयांवर छापे टाकून झडती घेतली होती.

पैशाला कसे फुटले पाय? सुप्रीम एनर्जी या आपल्या कंपनीच्या माध्यमातून धूत यांनी न्यू पॉवर कंपनीत गुंतवणूक केली. त्या मोबदल्यात १ मे २००९ रोजी चंदा कोचर यांनी आयसीआयसीआय बँकेची सूत्रे स्वीकारल्यानंतर कर्ज मंजूर करण्यात आले. त्यानंतर सुप्रीम एनर्जी आणि न्यू पॉवर यांच्यातील संशयास्पद व किचकट आर्थिक व्यवहारातून चंदा कोचर यांचे पती दीपक आणि धूत यांनी न्यू पॉवर - सुप्रीम एनर्जीच्या मालकी हक्कात बदल केले.

बातम्या आणखी आहेत...