आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुंतवणूक घटली:अस्थिरतेमुळे इक्विटी फंडातील गुंतवणूक 44 टक्के घटली

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेअर बाजारातील प्रचंड अस्थिरतेचा थेट परिणाम इक्विटी म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीवर दिसून येत आहे. गेल्या महिन्यात, इक्विटी फंडांमध्ये १५,८९० कोटी रुपयाची निव्वळ गुंतवणूक होती, ती मार्चमधील २८,४६३ काेटी रुपयांच्या तुलनेत ४४.२% जास्त होती. अॅम्फिच्या आकडेवारीनुसार, चांगली गोष्ट म्हणजे सलग १४ व्या महिन्यात इक्विटी म्युच्युअल फंडात निव्वळ गुंतवणूक झाली आहे.

बाजार विश्लेषकांचे मते, गेल्या काही महिन्यांपासून विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारात सातत्याने विक्री करत आहेत. त्यामुळे अस्थिरता वाढली असून किरकोळ गुंतवणूकदारांचा विश्वास डळमळीत झाला आहे. यामुळेच इक्विटी म्युच्युअल फंडातील गुंतवणूक कमी झाली आहे. हे देशांतर्गत म्युच्युअल फंड उद्योगाच्या एकूण व्यवस्थापनाखालील मालमत्तेतही दिसून आले. मंगळवारी प्रसिद्ध झालेल्या असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडियाच्या (अॅम्फि) अहवालानुसार, जुलै २०२१ पर्यंत म्युच्युअल फंड उद्योगाची व्यवस्थापनाखालील मालमत्ता ३५.३१ लाख कोटी रुपये होती, तर गेल्या आर्थिक वर्षाच्या अखेरीस (३१ मार्च) हा आकडा ११ टक्क्यांनी घसरून ३१.४२ लाख कोटी रुपये झाली.ी गेल्या ६ महिन्यांत अनिश्चितता वाढली आहे. माॅर्निंगस्टार इंडियानच; सहाय्यक व्यवस्थापक (संशोधन) हिंमांशू श्रीवास्तव म्हणाले मार्चच्या तुलनेत एप्रिलमध्ये इक्विटी फंडातील कमी गुंतवणुकीचे प्रमुख कारण महागाई, रशिया-युक्रेन युद्ध, जगभरातील वाढते व्याजदर, सध्याचे वातावरण असू शकते.

बातम्या आणखी आहेत...