आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Investments Like Funds, Insurance Will Increase Two And A Half Times To 315 Lakh Crores In 5 Years

विम्यात टाकताहेत भारतीय कुटुंबे:5 वर्षांत फंड, विमा यासारखी गुंतवणूक अडीचपट वाढून 315 लाख कोटी होईल

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय कुटुंबे पैसे गुंतवणूक करण्याच्या पद्धती वेगाने बदलत आहेत. बहुतांश कुटुंबे बँक एफडी आणि सोन्सासारख्या फिक्स्ड इन्कम अॅसेट्सऐवजी व्यावसायिक मॅनेजर्सच्या सल्ल्याने इक्विटी आणि बाँडसारख्या जास्त परतावा देणाऱ्या अॅसेट्समध्ये शिफ्ट करत आहेत. क्रिसिल रेटिंग्जच्या एका अहवालानुसार, भारतात मॅनेज्ड इन्व्हेस्टमेंट गेल्या आर्थिक वर्षात १३५ लाख कोटींची झाली, ती देशाच्या जीडीपीच्या ५७% आहे. पुढील पाच वर्षांत ती अडीचपट म्हणजे ३१५ लाख कोटी रुपये होण्याचा अंदाज आहे. ती जीडीपीच्या ७४% होईल. पाच वर्षांपूर्वी भारताची मॅनेज्ड इन्व्हेन्स्टमेंट इंडस्ट्री जीडीपीच्या ४१% होती. मॅनेज्ड फंडच्या नावाने म्युच्युअल फंड सर्वात आधी समोर येतो. मात्र देशाच्या मॅनेज्ड इन्व्हेस्टमेंट इंडस्ट्रीत सर्वाधिक ५२ लाख कोटींच्या मालमत्तेसह ३९% वाटा जीवन विम्याचा आहे. ४० लाख कोटींची मालमत्ता आणि २८.४% वाट्यासह म्युच्युअल फंड दुसऱ्या क्रमांकावर आहे.

मागील पाच वर्षांत बदलला ट्रेंड क्रिसिल मार्केट इंटेलिजन्स अँड अॅनालिटिक्सचे अध्यक्ष आशिष व्होरा यांच्यानुसार, मागील पाच आर्थिक वर्षांत गुंतवणुकीचे चित्र बदलले आहे. आर्थिक जागृती वाढणे, डिजिटलायझेशन, मध्यमवर्गाच्या डिस्पोजेबल उत्पन्नात वाढ आणि महागाईच्या काळात जास्त परताव्याच्या इच्छेने लोक पारंपरिक बचत साधनांऐवजी गुंतवणुकीकडे वळत आहेत.

बातम्या आणखी आहेत...