आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IPL रेटिंग:आयपीएलच्या टीव्ही रेटिंगमध्ये चौथ्या आठवड्यात 35% ने घट; तिसऱ्या आठवड्यात घटले होते 30% टक्के रेटिंग

नवी दिल्ली10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२२ च्या टीव्ही रेटिंगमध्ये घसरण सुरूच आहे. निम्म्याहून अधिक सामने झाले असून संघ प्ले ऑफमध्ये स्थान मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. प्राप्त माहितीनुसार आयपीएल २०२२ च्या चौथ्या आठवड्यात टीव्ही रेटिंग ३५% कमी झाले.

आयपीएलच्या इतिहासात कधीच इतके कमी टीव्ही रेटिंग आले नव्हते. या वेळी बहुतांश सामने सायंकाळी होत आहेत. तरीही टीव्ही रेटिंगमध्ये एवढी घसरण होत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. जर प्रारंभीच्या चार आठवड्यांचा विचार केला तर एकूण आयपीएलच्या टीव्ही रेटिंगमध्ये ३०% घट नोंदवली गेली होती. नुकतेच आयपीएलचे चेअरमन बृजेश पटेल यांनी म्हटले होते की, होय, टीव्ही रेटिंगमध्ये घसरण झाली आहे. परंतु यामुळे आयपीएलच्या लोकप्रियतेवर काहीही परिणाम झालेला नाही.

बृजेश पटेल यांनी दावा केला होता की, लोक आता गटांमध्ये, रेस्टॉरंट आणि बारमध्ये जाऊन सामने बघत आहेत. आयपीएल २०२२ टीव्हीवर यशस्वी न होण्यामागे अनेक कारण सांगितली जात आहेत. यात मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंगची सुमार कामगिरी, विराट कोहली, एम.एस. धोनी आणि रोहित शर्मासारखे मोठे खेळाडू धावा काढत नाहीत, याही कारणांचा समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत...