आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयपीएल 2020:टायटल स्पॉन्सरशिपच्या रेसमध्ये बाबा रामदेव यांच्या पतंजलीची उडी, चीन विरोधानंतर व्हिव्होसोबतचा करार रद्द

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

लडाखच्या गलवान घाटीत झालेल्या सीमा वादानंतर देशात चीनविरोधी भावना तयार झाली आहे. याच पार्श्वभूमिवर भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (बीसीसीआय) ने आयपीएल 2020 च्या टायटल स्पॉन्सरशिपसाठी चीनी स्मार्टफोन कंपनी व्हिव्होसोबतचा करार स्थगित केला आहे. आता अशी माहिती येत आहे की, योग गुरु बाबा रामदेव यांची कंपनी पतंजली आयुर्वेद आयपीएल 2020 च्या स्पॉन्सरशिप टायटलसाठी बोली लावण्याची शक्यता आहे.

पतंजलीला ग्लोबल मार्केटिंग प्लॅटफॉर्मवर यायचे आहे

पतंजलीचे प्रवक्ते एसके तिजारावाला यांनी पीटीआयशी बातचीतदरम्यान सांगितले की, आम्ही पतंजली ब्रँडला ग्लोबल मार्केटिंग प्लॅटफॉर्मवर घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहोत. यासाठी आम्ही यावर्षी होणाऱ्या आयपीएलच्या टायटल स्पॉन्सरशिपसाठी विचार करत आहोत.

आयपीएलसाठी नवीन टायटल स्पॉन्सरच्या शोधात बीसीसीआय

देशातील चीन विरोधी भावनेनंतर बीसीसीआयने 6 ऑगस्टला आयपीएल 2020 च्या टायटल स्पॉन्सरशिपवरुन व्हिव्होला हटवले आहे. यानंतर बीसीसीआय यावर्षीसाठी आयपीएल टायटल स्पॉन्सरच्या शोधात आहे. बीसीसीआय यावर्षी आयपीएल टायटल स्पॉन्सरशिपसाठी 50 टक्के सूट देऊ शकते. टायटल स्पॉन्सरशिपमधून यावर्षी बीसीसीआयला 300 कोटी रुपयांची कमाई होण्याची आशा आहे. तिजारावाला यांनी सांगितल्यानुसार, बीसीसीआय टायटल स्पॉन्सरशिपसाठी सोमवारी एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट (ईओआय)आणू शकते. पतंजली आयुर्वेद 14 ऑगस्टला ईओआय जमा करेल.

व्हिव्हो दरवर्षी बीसीसीआयला 440 कोटी रुपये द्यायचा

आयपीएलच्या टायटल स्पॉन्सरशिपसाठी चीनी स्मार्टफोन निर्माता कंपनी व्हिव्हो आणि बीसीसीआयदरम्यान 2018 मध्ये एक करार झाला होता. हा करार पाच वर्षांसाठी होता. या कराराअंतर्गत आयपीएलच्या टायटल स्पॉन्सरशिपसाठी व्हिव्हो बीसीसीआयला 440 कोटी रुपये द्यायचे.

बातम्या आणखी आहेत...