आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • IPS Deputation; Petition Against The Center Rejected, Supreme Court Refuses To Intervene

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नवी दिल्ली:आयपीएस प्रतिनियुक्ती; केंद्राच्या विरोधातील याचिका फेटाळली, हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयपीएस अधिकाऱ्यांना प्रतिनियुक्तीवर बोलावण्याच्या केंद्र सरकारच्या अधिकाराला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळून लावली. सर्वाेच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एल. नागेश्वरा राव यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने म्हटले आहे की, ते या प्रकरणात हस्तक्षेप करणार नाहीत. याचिकाकर्ते पश्चिम बंगालचे वकील अबू सोहेल यांनी अशा प्रचलित परिस्थितीमुळे केंद्र व राज्य सरकार यांच्यात अनेकदा संघर्ष झाला आहे.. यामुळे घटनेच्या संघीय रचनेला इजा पाेहोचते, असा युक्तिवाद केला.

अलीकडेच बंगालच्या तीन आयपीएस अधिकाऱ्यांना केंद्र सरकारने प्रतिनियुक्तीवर आपल्याकडे बाेलावले हाेते. यामुळे केंद्र आणि पश्चिम बंगाल सरकार यांच्यात संघर्ष सुरू झाला आहे. पश्चिम बंगालमधील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बदल्या केल्याचा आरोप केला जात होता. त्यामुळे याचिकेला महत्व प्राप्त झाले होते.

बातम्या आणखी आहेत...