आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • IPS In Up Disguises Herself To Test Her Policemen Reports Robbery, Latest News And Update

महिला IPS अधिकाऱ्याने वेश पालटून घेतली पोलिसांची परीक्षा:सशस्त्र लुटमारीची तक्रार केली अन् तपासून पाहिली कार्यतत्परता

लखनऊ25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

उत्तर प्रदेशाच्या एका महिला पोलिस अधिकाऱ्याने आपल्या पोलिसांची कार्यतत्परता एका अनोख्या पद्धतीने तपासून पाहिली. भारतीय पोलिस सेवेच्या या अधिकाऱ्याने आपला वेश बदलून आपत्कालीन क्रमांकावर सशस्त्र लुटमारीची तक्रार केली. सुदैवाने त्यांच्या या परीक्षेत सर्वच पोलिस पास झाले.

IPS अधिकारी चारु निगम औरेयात पोलिस अधीक्षकपदी (SP) तैनात आहेत. गुरूवारी त्यांनी एक कुर्ता घातला व ओढणीने आपले तोंड झाकून डोळ्यांवर काळा चष्मा घातला. यामागे कोणत्याही अधिकाऱ्याला आपली ओळख पटू नये असा त्यांचा हेतू होता. त्यानंतर त्यांनी आपत्कालीन क्रमांक 112 वर कॉल करुन सशस्त्र लुटमारीची तक्रार केली. त्या म्हणाल्या - "मी सरीता चौहाण बोलत आहे. 2 सशस्त्र लोकांनी माझ्याशी लुटमार केली आहे."

मायक्रो-ब्लॉगिंग वेबसाइट ट्विटरवर औरेया पोलिसांनी जारी केलेल्या व्हिडिओ व छायाचित्रात IPS चारु निगम एका निर्जन रस्त्यावर फोनवर संवाद साधताना दिसून येत आहेत. त्यांच्या कॉलच्या प्रत्युत्तरादाखल 3 पोलिस कर्मचारी तत्काळ घटनास्थळी पोहोचले.

पोलिसांना नव्हती खबरबात

पोलिसांनी महिलेची तक्रार ऐकली व चौकशी केली. यावेळी त्यांना आपण बोलत असलेली महिला पोलिस अधीक्षक असल्याची त्यांना खबरबातही नव्हती. त्यांनी जवळपास तासभर वाहनांची तपासणी केल्यानंतर त्यांना तक्रार करणारी 'घाबरलेली व भयभीत' झालेली महिला आपलीच उच्चपदस्थ अधिकारी असल्याचे समजले.

पोलिसांनी केलेल्या ट्विटनुसार, IPS चारु निगम स्थानिक पोलिसांचा 'रेस्पॉन्स टाइम' पडताळून पाहत होत्या. त्याचे त्यांना समाधानकारक प्रत्युत्तर मिळाले.

व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

एका दुचाकीच्या मागच्या सिटवर बसलेल्या महिला IPS अधिकाऱ्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. चारु निगम यांच्या या परीक्षेमुळे स्थानिक पोलिसांच्या कार्यतत्परतेत मोठी वाढ झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...