आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Iran Israel Tensions: India Bound Israel Ship Missile Attack Updated | Iran Israel Arabian Sea Latest News, Ship Reaches India Gujarat Mundra Port

जहाजावर मिसाइल हल्ला:गुजरातकडे येणाऱ्या इस्रायलच्या जहाजावर झालेल्या मिसाइल हल्ल्याचे फोटो आले समोर

मुंद्रा6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
हा फोटो इस्राइलच्या जहाजावर गुरुवारी झालेल्या मिसाइल हल्ल्यानंतरचा आहे. जहाज तेव्हा अरबी समुद्रात होते. - Divya Marathi
हा फोटो इस्राइलच्या जहाजावर गुरुवारी झालेल्या मिसाइल हल्ल्यानंतरचा आहे. जहाज तेव्हा अरबी समुद्रात होते.
  • इंजिन खराब झाल्यावरही मुंद्रा किनारपट्टीवर आले जहाज

इस्रायलचे मालवाहू जहाज अखेर शुक्रवारी गुजरातच्या मुंद्रा पोर्टवर दाखल झाले. या जहाजावर गुरुवारी मिसाइल हल्ला करण्यात आला होता. इस्राइलने या हल्ल्यामागे इराणला दोषी ठरवले आहे. पण, याची अद्याप पुष्टी झाली नाही. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे सांगितले की, ते या प्रकरणावर बारकाईने लक्ष्य देऊन आहेत. अद्याप भारत सरकारकडून या प्रकरणावर अधिकृतरित्या बोलण्यात आले नाही.

हल्ल्यादरम्यान या जहाजावर काही भारतीय नागरिक होते. सुदैवाने कोणालाही हानी झाली नाही.
हल्ल्यादरम्यान या जहाजावर काही भारतीय नागरिक होते. सुदैवाने कोणालाही हानी झाली नाही.

जहाजावरील सर्वजण सुरक्षित

इस्रायलच्या जहाज कंपनीने म्हटले की, हे जहाज तंजानियावरुन भारताकडे येत होते. यावेळी जहाजावर एक मिसाइल आली. या हल्ल्यानंतर जहाजाचे इंजिन बिघडले आहे. या जहाजाचा मालकी हक्क एक्सटी मॅनेजमेंटकडे आहे. ही कंपनी सध्या इस्रायलमधील पोर्ट सिटी हाइफामध्ये आहे.

हल्ल्यानंतरही जहाज आपल्या ठरलेल्या जागी आले
हल्ल्यानंतरही जहाज आपल्या ठरलेल्या जागी आले

एका महीन्यापूर्वीही इस्रायलच्या जहाजावर हल्ला झाला होता

मागच्या महिन्यात ओमानच्या खाडीत एका इस्रायलच्या जहाजावर हल्ला झाला होता. 25 फेब्रुवारीच्या रात्री एमवी हेलियोस रे नावाच्या जहाजावर झालेल्या हल्ल्याबाबत पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूने इराणला दोषी ठरवले होते. पण, इराणने या आरोपांचे खंडन केले होते.

मागच्या महिन्यात ओमानच्या खाडीत हल्ला झालेले जहाज.
मागच्या महिन्यात ओमानच्या खाडीत हल्ला झालेले जहाज.
बातम्या आणखी आहेत...