आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयात थांबवली:इराणने भारतातून बासमती, चहाची आयात थांबवली

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

इराणने गेल्या आठवड्यात भारतीय बासमती तांदूळ व चहाची आयात बंद केली आहे. इराणच्या खरेदीदारांनी अचानक घेतलेल्या या निर्णयाचे कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही.

हिजाबविरोधी आंदोलनाचा परिणाम पश्चिम आशियायी दुकाने, हॉटेल व बाजारपेठांवर झाला. त्यातून हा निर्णय घेतला असावा, असे भारतीय निर्यातकांचे म्हणणे आहे. काही लोकांच्या मते इराण आयातीच्या नव्या करारात विलंब करत आहे. कारण भारत व इराणचे सरकार स्थानिक चलनात व्यापाराबाबतचा करार करू शकते. परंतु या निर्णयानंतर आता काही वस्तूंच्या निर्यातीवरही परिणाम दिसेल. भारत इराणला ३३.५ कोटी किलो चहा, १५ लाख कोटी बासमती तांदूळ निर्यात करतो.

बातम्या आणखी आहेत...