आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Is Hydroxychloroquine Helpful In Treatment Of Corona? Doctors Are Also Using It.

न्यूयॉर्क टाइम्सकडून:हायड्रोक्सीक्लोरोक्वीन औषधामुळे कोरोनावर उपचार संभव आहे का ? जाणून घ्या संशोधकांचे या औषधावर काय मत आहे

नवी दिल्ली3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोनावर औषध नसल्यामुळे अनेक डॉक्टर्स हे औषध वापरत आहेत

डेनिस ग्रेडी, कॅटी थॉमस, पॅट्रिक ज ल्योन्स
जगभरातील शास्त्रज्ञ कोरोना व्हायरसवरील उपचारासाठी औषध आणि लस शोधत आहेत. या सगळ्यात एका औषधाची जगभरात जोरदार चर्चा सुरू आहे. या औषधाचे नाव आहे 'हायड्रोक्सीक्लोरोक्वीन'. हे औषध पहिल्यांदा तेव्हा चर्चेत आले, जेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताकडे हायड्रोक्सीक्लोरोक्वीन औषध देण्याची विनंती केली. मलेरिया आजाराच्या उपचारामध्ये वापर होणाऱ्या औषधापासून अनेक देशांना कोरोनावरील औषध तयार होण्याची आशा आहे. भारताने अमेरिका, ब्राझील, इस्राइलसह अनेक देशांना है औषध दिले आहे.
चीनमध्ये 62 जणांवर केलेल्या एका अभ्यासातून हे समोर आले की, हायड्रोक्सीक्लोरोक्वीन कोव्हिड-19 आजारात काही अंशी उपयोगी आहे. परंतू, या अभ्यासादरम्यान कोरोनाच्या रुग्णांना हायड्रोक्सीक्लोरोक्वीनसोबत इतरही काही औषधे देण्यात आली होती. सध्या डॉक्टर्स हे शोधत आहे की, कोणते रुग्ण या औषधामुळे ठीक झाले आहेत. संशोधकांनी हेदेखील स्पष्ट केले आहे की, हायड्रोक्लोरोक्वीन औषधामुळे कोरोना बरा होईल का नाही, हे पाहण्यााठी अजून काही चाचण्या कराव्या लागतील.

काय आहे हायड्रोक्सीक्लोरोक्वीन?

हायड्रोक्सीक्लोरोक्वीन या औषधामुळे मलेरिया आजारावर उपचार केला जातो. याचा उपयोग रिमेटॉयड आर्थिराइटिस आणि ल्यूपसमध्येही केला आहे.

हायड्रोक्सीक्लोरोक्वीनला का कोरोनावरील औषध म्हटले जात आहे ?

याची अनेक कारणे आहेत. एका लॅब स्टडीनुसार क्लोरोक्वीन कोरोना व्हायरसला शरीरातील सेल्समध्ये जाण्यापासून रोखतो. परंतू, हायड्रोक्सीक्लोरोक्वीनवर केलेल्या अनेक अभ्यासातून हेदेखील समोर आले आहे की, है औषध इंफ्लुएंजा आणि दुसऱ्या व्हायरल आजारांना ठीक करण्यास सक्षम नाही.
चीन आणि फ्रांसच्या डॉक्टर्सने दिलेल्या रिपोर्ट्सनुसार, हायड्रोक्सीक्लोरोक्वीन अँटीबायोटिक अॅजिथ्रोमायसिनसोबत मिळून उपचारात चांगला परिणाम दिले. पण, या अभ्यासात कोणत्याच कंट्रोल ग्रुपला सामील केले नव्हते. त्यामुळे या अभ्यासाचे खंडन करण्यात आले. अतिशय कमी रुग्णांवर केलेल्या चाचण्यांमुळे या औषधाची योग्यता सिद्ध होत नाही. या अभ्यासाला छापणाऱ्या प्रकाशनानेही स्पष्ट केले होते की, हा अभ्यास आपल्या मापदंडांना पूर्ण करत नाही.

हायड्रोक्सीक्लोरोक्वीनमुळे तुम्ही कोरोनापासून दूर राहू शकता ?

यूनिव्हर्सिटी ऑफ मिनसोटाचे शोधकर्ता कोरोना संक्रमित लोकांवर या औषधाचे परिक्षण करुन, या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. सध्या या गोष्टीचे कोणतेच ठोस पुरावे नाहीत की, हायड्रोक्सीक्लोरोक्वीनच्या मदतीने तुम्ही कोरोनापासून वाचू शकता.

फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशनने हायड्रोक्सीक्लोरोक्वीनला अप्रूवल दिले आहे का ?
हायड्रोक्सीक्लोरोक्वीनला कोव्हिड-19 नाही तर मलेरिया, ल्यूपस आणि रिमेटॉयड आर्थिरायटिसच्या उपचारासाठी अप्रुवल मिळाले आहे.

या औषधाचा उपयोग कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी केला जाऊ शकतो का ?

कोरोना व्हायरसचे औषध अद्याप नसल्याने रुग्णलयात डॉक्टर्स रुग्णांना हे औषध देत आहेत. या औषधावर जगभरात क्लीनिकल ट्रायल्सची सुरुवात झाली आहे. संशोधकांनुसार, या औषधावर योग्य अभ्यास आणि चाचण्या केल्यानंतरच याचा कोरोनावरी परिणाम समजेल. जर हे ट्रायल्स अयशस्वी झाले, तर दुसऱ्या पद्धतीने कोरोनावरील औषध शोधावे लागेल.

हायड्रोक्सीक्लोरोक्वीन औषधामुळे काही धोका आहे का ?

इतर अनेक औषधांप्रणाणेच हायड्रोक्सीक्लोरोक्वीनचेही काही साइड इफेक्ट्स आहे. ह्रदय रोगी, डोळे, लिव्हर आणि किडनी संबंधी आजार असलेल्या लोकांवर या औषधांचा वाईट परिणाम पडू शकतो. हायड्रोक्सीक्लोरोक्वीनच्या वापराने उलटी, संडास लागणे असे काही त्रास होऊ शकतात. या औषधांचा उपयोग स्टेज वन असलेल्या कोरोनाग्रस्तांसाठी केला जाऊ शकतो. पण, गंभीर स्वरुपाचा कोरोना झालेल्या रुग्णांवर याचा उपयोग होईल का नाही, याची अद्याप माहिती नाही.

बातम्या आणखी आहेत...